गिरीश महाजनांच्या अडचणी वाढल्या, पुणे पोलिसांनी जप्त केले ट्रकभर पुरावे

जळगावच्या मराठा विद्याप्रासारक संस्थेशी निगडीत वादात दाखल गुन्ह्यावरून पुणे पोलिसांची कारवाई

girish mahajan slams thackeray government
महाविकास आघाडी म्हणजे गांधीजींची तीन बंदरे, गिरीश महाजनांची खोचक टीका

नाशिक : जळगावच्या मराठा विद्याप्रासारक संस्थेशी निगडीत वादातून भाजप नेते गिरीश महाजन यांच्या विरोधात अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाला होता. पुणे पोलिसांनी जळगावमध्ये काही ठिकाणी छापे टाकले होते. पुणे पोलिसांनी या प्रकरणी जळगावातून टेम्पो भरून कागदपत्र जप्त केली आहेत. पुणे पोलिसांना यांना या प्रकरणात मोठं लीड मिळण्याची शक्यता असल्याने भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असल्याचीही चर्चा आहे.

जळगाव मराठा शिक्षण प्रसारक संस्थेशी संबंधित कागदपत्र ही भोईटे आणि आणखी एक आरोपी तानाजी यांच्या घरी मिळून आली आहेत. जी कागदपत्रं संस्थेत असणे आवश्यक आहेत ती दुसरीकडे आढळल्याने या कागदपत्रांतून मोठे लीड मिळण्याची शक्यता असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. जळगावच्या मराठा विद्याप्रासारक संस्थेशी निगडीत वादात दाखल गुन्ह्यावरून ही कारवाई करण्यात आली आहे.

सुरुवातीला जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. नंतर कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. अ‍ॅड. विजय पाटील यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जळगावला गिरीश महाजन यांच्यविरोधात नोंदवण्यात आलेल्या संबंधित गुन्ह्याच्या तपासासाठी गेलेल्या पथकाकडून एक टेम्पो भरून कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत. पुणे पोलिसांनी कागदपत्र जप्त करत पुण्याला आणली आहेत.