घरमहाराष्ट्रनाशिकपडद्यामागील विश्व वेगळेच : भांडारकर

पडद्यामागील विश्व वेगळेच : भांडारकर

Subscribe

जे चकचकित जग दिसते ते पडद्यामागे नसते. त्यामुळे या क्षेत्रात यायचे असेल तर प्रचंड मेहनतीची तयारी असायला हवी तरच तुम्ही यशस्वी होऊ शकतात, असा सल्ला प्रसिद्ध दिग्दर्शक पद्मश्री मधूर भांडारकर यांनी दिला.

जे चकचकित जग दिसते ते पडद्यामागे नसते. त्यामुळे या क्षेत्रात यायचे असेल तर प्रचंड मेहनतीची तयारी असायला हवी तरच तुम्ही यशस्वी होऊ शकतात, असा सल्ला प्रसिद्ध दिग्दर्शक पद्मश्री मधूर भांडारकर यांनी दिला.

तरुण होतकरू उद्योजकांना यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन मिळून नाशिकमध्ये नाविन्यपूर्ण उद्योग सुरू व्हावेत तसेच नवीन उद्योजक उदयास यावेत, यासाठी नाशिक आंत्रप्रुनर फोरमतर्फे बिल्डिंग सस्टेनेबल एंटरप्राइजेस हा उपक्रम हॉटेल एक्स्प्रेस इन येथे पार पडला. यावेळी भांडारकर बोलत होते. यावेळी अभिनेते सतीश कौशिक, डबेवाला असोसिएशनचे डॉ. पवन अग्रवाल, परम वीरचक्र विजेता योगेंद्र सिंग यादव आदी मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी सकाळी अन्न व औषध प्रशासन आयुक्त पल्लवी दराडे, सनदी अधिकारी प्रवीण दराडे, प्रख्यात गुंतवणूकदार नागराजा प्रकासमा, बांधकाम व्यवसायिक नरेश कारडा, संजय लोढा, अजय ब्रम्हेचा यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. प्रथम सत्रात सुरुवातीला प्रख्यात गुंतवणूकदार नागराजा प्रकासमा, गोली वडापावचे वेंकि अय्यर यांनी मार्गदर्शन केले.

- Advertisement -

सेलेब्रिटी डेंटिस्ट डॉ. संदेश मयेकर आणि अन्न व औषधी प्रशासन आयुक्त पल्लवी दराडे यांची संजय लोढा यांनी मुलाखत घेतली. आंत्रप्रुनर फोरमचे अध्यक्ष संजय लोढा यांनी मधूर भांडारकर यांची मुलाखत घेतली. यावेळी अभिनेते सतीश कौशिक यांनीही फिल्मी करिअरबद्दल विचार मांडले. योगेंद्र सिंंग यादव यांनी कारगिल विजयाची शौर्यकथा सांगितली, तर दुबईस्थित हिरे उद्योजक डॉ. हर्षद मेहता यांनीही उपस्थित उद्योजकांना मार्गदर्शन केले.

यशस्वी उद्योजकतेसाठी जिद्द अन् चिकाटी

कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी जिद्द आणि चिकाटी हे गुण असायला हवे. प्रामाणिकपणा आणि स्वत:च्या कामावर विश्वास असेल तर कितीही खडतर परिस्थितीतून मार्ग काढता येतो. मुंबईतील डबेवाला यांचे काम प्रत्येकासाठी प्रेरणादायी असेच आहे. विश्वास, गतिमानता आणि नियमितता हेच प्रत्येक यशस्वी व्यवसायामागील यशाचे सूत्र असल्याचे मत डबेवाला प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष डॉ. पवन अग्रवाल यांनी विशेष सत्रात व्यक्त केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -