विसर्ग वाढल्यानं गोदावरीला पूर, नदीकाठची दुकानं सुरक्षित ठिकाणी हलवली

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारं गंगापूर धरणातला जलसाठा ९८ टक्क्यांवर पोहोचला

Godavari Flood

आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारं गंगापूर धरणातला जलसाठा ९८ टक्क्यांवर पोहोचल्याने जलसंपदा विभागाने कालपासून विसर्ग सुरू केलाय. त्यामुळे गोदावरीला पूर आला आहे.

जलस्तर वाढल्यानं रामकुंड परिसरासह नदीपात्रातली काही मंदिरंही पाण्याखाली गेलीत. हवामान विभागानं दोन दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट दिल्यानं विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. दरम्यान, गोदावरीला आलेल्या पुरामुळे व्यावसायिकांनी नदीकाठची दुकानं सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केली. आज पावसाने उघडीप दिल्यानं गोदावरीचा पूर कमी होण्याची शक्यता वर्तवली जातेय.