घरताज्या घडामोडीसोनसाखळी चोरटे २४ तासांत गजाआड

सोनसाखळी चोरटे २४ तासांत गजाआड

Subscribe

सोनसाखळी हिसकावून फरार झालेल्या दोन चोरट्यांना पंचवटी पोलिसांनी चोवीस तासांत अटक केली. त्यांच्याकडून १५ हजार रुपयांची सोनसाखळी व दुचाकी जप्त केली आहे. राजू मुंजाभाऊ वाघमारे (२२, रा. गोरक्षनगर, आरटीओ कॉर्नर, म्हसरूळ) व किरण भगवान पाईकराव (२४, रा. कालिका चाळ, पंचवटी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

शहरात सोनसाखळी हिसकावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे महिला वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी (दि.) चोरट्यांनी दोन ठिकाणी लाख रुपये किमतीच्या सोनसाखळ्या हिसकावल्याच्या घटना उघडकीस आल्या. पंचवटीतील चक्रधरनगर येथील पुष्पलता नेहते यांना चोरट्यांनी पत्ता विचारण्याचा बहाणा करून त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची पोत हिसकावून पळ काढला होता. दुसर्‍या घटनेत पंचवटीतील सुकेनकर लेन येथील अनिता अनिल शेवाळे या कामानिमित्त मुठे गल्ली येथून जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून पळ काढला होता. याप्रकरणी शळके यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी म्हसरुळ येथून राजू वाघमारे यास अटक केली. त्याच्याकडे चौकशी करता त्याने किरण पाईकरावसमवेत सोनसाखळी हिसकावल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यालाही अटक करत त्यांच्याकडून ६ ग्रॅम वजनाची १५ हजार रूपये किंमतीची सोन्याची पोत जप्त केले. पोलिसांनी गुन्ह्यात संशयितांनी वापरलेली काळ्या रंगाची पल्सर जप्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -