Friday, June 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र नाशिक खूशखबर: नाशिकमधील १४६ मार्गांवर धावणार २५० बस

खूशखबर: नाशिकमधील १४६ मार्गांवर धावणार २५० बस

पालिका शहर बससेवेच्या मार्ग, टप्पे व दरपत्रकास आरटीओची मान्यता

Related Story

- Advertisement -

नाशिक महानगर परिवहन महामंडळ मर्यादित, नाशिक यांनी नाशिक महानगरपालिका हद्दीत व महानगरपालिका हद्दीच्या पलीकडील लगतच्या २० किलोमीटर परिसरात प्रस्तावित केलेल्या विविध १४६ मागार्र्ंवर टप्पा वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी बससेवेचे मार्ग, टप्पे व दरपत्रकास प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने मान्यता दिल्याची माहिती प्रादेशिक परिवहन प्राधिकरण सचिव तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी दिली.

नाशिक शहरात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाद्वारे प्रवासी वाहतुकीसाठी चालवण्यात येत असलेली शहर बससेवा नाशिक महापालिकेद्वारे सुरू करण्याचा निर्णय नाशिक महानगरपालिकेमार्फत महासभेतील ठरावात घेण्यात आला होता. नाशिक महापालिका क्षेत्रात शहर बससेवेसाठी जीसीसी तत्वावर ट्रॅव्हल्स टाईम कार रेंटल प्रा. लि. पुणे व सिटी लाईफ लाईन ट्रॅव्हल्स प्रा. लि. दिल्ली या ऑपरेटर्सची नेमणूक करण्यात आली असून बस ऑपरेटरसोबत बसची खरेदी, व्यवस्थापन, संचालन व देखभालीसाठी १० वर्षांचा करारनामा नाशिक महानगर परिवहन महामंडळ मर्यादित यांच्यामध्ये करण्यात आलेला आहे. नाशिक शहर बससेवा सुरू करण्यासाठी ट्रॅव्हल टाईम कार रेंटल प्रा. लि. कंपनी, पुणे यांच्यामार्फत ३० (मिनी डिझेल) बसेस व १२० सी.एन.जी.) बसेसचा पुरवठा करण्यात येत असून पुणे सिटी लाईफ लाईन ट्रॅव्हल्स प्रा. लि. दिल्ली यांच्यामार्फत २० (डिझेल बस) व ८० (सी.एन.जी.) बस अशा पर्यावरणपूरक इंधन असलेल्या बसेसचा पुरवठा करण्यात येत आहे. प्रथम टप्प्यात सुमारे अडीचशे बसेस टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचे नियोजन नाशिक परिवहन महामंडळ मर्यादित यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

- Advertisement -

त्यानुसार नाशिक महानगर परिवहन महामंडळ मर्यादित यांनी शहर बससेवा सुरू करण्याबाबत महाराष्ट्र शासनास प्रस्ताव सादर केला. त्यास मान्यता मिळाली आहे. नाशिक महानगर परिवहन महामंडळ मर्यादित नाशिक यांनी नाशिक शहर परिसरात एकूण २५० बसेसद्वारे शहर बससेवा सुरू करण्यासाठी १४६ मार्गांवर टप्पा वाहतुकीस परवाना मिळणे व टप्पा दरास मंजुरीबाबत दोन प्रस्ताव प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांच्याकडे सादर केले होते. याबाबत प्रादेशिक परिवहन प्राधिकरण अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय समितीची परिचलन पद्धतीने बैठक होऊन त्यात सादर केलेल्या प्रस्तावावर ठराव मंजूर करण्यात आला. त्यानुसार नाशिक महानगर परिवहन महामंडळ मर्यादित नाशिक यांनी नाशिक शहराच्या महापालिका हद्दीत व महापालिका हद्दीच्या पलीकडील २० किलोमीटर परिसरात प्रस्तावित केलेल्या विविध १४६ मार्गांवर टप्पा वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. नाशिक महानगर परिवहन महामंडळाने सादर केलेल्या व महाराष्ट्र शासन राजपत्रात नमूद किमान व कमाल दरांच्या अनुषंगाने दरांची पडताळणी करून पहिल्या टप्प्यास म्हणजे ० ते २ किलोमीटरपर्यंत १० रुपये पूर्ण आकार तर ५ रुपये अर्धा आकार तसेच कमाल ५० किलोमीटरपर्यंतच्या पहिल्या टप्प्यास ६५ रुपये पूर्ण आकार व ३५ रुपये अर्धा आकार इतकी आकारणी करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

- Advertisement -