घरमहाराष्ट्रनाशिकराज्यपालांनी केली त्र्यंबकेश्वर मंदिरात पूजा..

राज्यपालांनी केली त्र्यंबकेश्वर मंदिरात पूजा..

Subscribe

नाशिक: महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी आज त्र्यंबकेश्वर येथे जाऊन त्र्यंबकेश्वर मंदिरात पूजा केली. त्यांचा हा पहिलाच नाशिक दौरा होता. नाशिक येथील ओझर विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतानंतर त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे गेले. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये यावेळी पुरोहितांसमवेत त्यांनी पूजा करून आरती करत आशीर्वाद घेतले.

यावेळी उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण, येवला उपविभागीय अधिकारी राजेंद्र पाटील, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगांवकर, उपनगराध्यक्ष कैलास चोथे, देवस्थानचे विश्वस्त संतोष कदम, तहसीलदार दीपक गिरासे आदी उपस्थित होते. त्र्यंबकेश्वर येथे आगमन झाल्यावर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रवीण निकम यांनी राज्यपाल महोदयांचे स्वागत केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -