घरमहाराष्ट्रनाशिकसिडकोवासियांना खूषखबर; घरांवर पुढील महिन्यात मालकीहक्क

सिडकोवासियांना खूषखबर; घरांवर पुढील महिन्यात मालकीहक्क

Subscribe

मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक, डिसेंबर २०१८ मधील निर्णयानंतर लवकरच अधिकृत घोषणा होण्याचे संकेत

सिडकोची घरे 99 वर्षे कराराच्या लीजऐवजी फ्री होल्ड करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक वर्षापूर्वी दिलेल्या आश्वासनाची लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यासंदर्भात शनिवारी मुंबईत झालेल्या बैठकीत नाशिक, औरंगाबाद व नवीन मुंबई येथील सिडकोची घरे लीज होल्ड टू फ्री होल्ड करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी पुढील महिन्यात करण्याबाबत एकमत झाल्याचे समजते. त्यामुळे सिडकोवासियांना आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे.

यासंदर्भात मुंबईतील सिडको कार्यालयात नुकतीच केंद्रीयमंत्री अतुल सावे, सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर, नाशिकचे प्रशासक घनश्याम ठाकूर, आमदार सीमा हिरे यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. यात नाशिक, औरंगाबाद व नवीन मुंबई येथील सिडकोची घरे लीज होल्ड टू फ्री होल्ड करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला अंतिम स्वरूप देण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. या घोषणेची अंमलबजावणी झाल्यास आगामी निवडणुकांपूर्वी तमाम सिडकोवासीयांना सरकारकडून अश्वासनपूर्तीची महत्वपूर्ण भेट दिली जाणार आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी नवी मुंबई, नाशिक व औरंगाबाद या तीनही ठिकाणी सिडकोची रचना, धोरण व अन्य अनेक बाबतीत विविधता असल्याने तिन्ही ठिकाणच्या कार्यपद्धतीचा अंतिम मसुदा तयार करण्याच्या कामाला वेग देण्यात आला आहे. हा मसुदा अखेरच्या टप्प्यात असून, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात याबाबत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

हे निर्णयही महत्त्वाचे…

फ्री होल्डबरोबरच या बैठकीत सिडको प्रकल्पग्रस्तांना द्यायच्या मोबदल्याच्या विषयावरही चर्चा करण्यात आली असून, यासंदर्भात लवकरच जिल्हाधिकार्‍यांसमवेत बैठक घेण्यात येऊन हा प्रश्नही प्राधान्याने मार्गी लावण्यात येणार आहे. याशिवाय सध्याच्या वारस नोंदणी करण्याच्या प्रक्रियेतील जाचक व त्रासदायक त्रुटी दूर करून ही प्रक्रिया अधिक सोपी करण्याच्या व त्याचा आराखडा तयार करण्याच्या कामालाही गती देण्याचा निर्णय घेण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -