घरताज्या घडामोडी'सरकार राऊतला नोकरी देऊ शकत नसेल, तर काहीतरी गडबड आहे'

‘सरकार राऊतला नोकरी देऊ शकत नसेल, तर काहीतरी गडबड आहे’

Subscribe

राज्याचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची ठाकरे सरकारवर टीका

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी नाशिकच्या दौऱ्यावर गेले होते. दरम्यान, त्यांनी नाशिकमधील गुलाबी गाव भिंतघर याठिकाणी हजेरी लावली. नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाईंडच्या कार्यक्रमाला ते उपस्थित होते. त्यावेळी बोलत असताना त्यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले ‘आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत हिला जर राज्य सरकार आणि क्रिडा मंत्री सुनिल केदार नोकरी देऊ शकत नसतील तर काहीतरी गडबड आहे’, असे म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.

राज्य सरकार काय करतय?

‘एकीकडे राज्य सरकार आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत हिला नोकरी देत नाही. तर दुसरीकडे पाहिला गेले तर अशी अनेक आदिवासी गाव आहेत. ज्या भागात शिक्षक मिळत नाही. तसेच शिक्षकांची भरती देखील होत नाही. मग महाराष्ट्र राज्य सरकार काय करत आहे?’,असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

मी राज्याचा सेवक आहे

‘मी राज्याचा सेवक आहे राज्यपाल नाही. तसेच देश हा दानशुरांमुळेच चालतो. कारण अंध विद्यार्थ्यांकडून काम करणाऱ्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनाही दैवी देणगी मिळाली आहे, असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे दृष्टी बाधितांसाठी काम करणाऱ्यांना अभिवादन. त्याचप्रमाणे शासनात काम करणाऱ्यांना देखील दैवी दृष्टी मिळावी’, असा टोला राज्यपालांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.

राज्यापालांच्या हस्ते सातबारा प्रदान

सुरगणा येथे आदिवासी लाभार्थ्यांना राज्यपालांच्या हस्ते सातबारा प्रदान करण्यात आला. ११ हजार १३७ लाभार्थ्यांना राज्यपालांच्या हस्ते सातबारा देण्यात आला. या कार्यक्रमाच्या वेळी विधानसभेचे उपसभापती भगतसिंह कोश्यारी देखील उपस्थित होते त्यांनी यावेळी गावातील काही समस्या मांडल्या ते म्हणाले ‘या भागात भरपूर पाऊस पडतो. पण, सर्व पाणी समुद्राला वाहून जाते. पाणी अडवण्यासाठी तुम्ही मदत करा आणि हा भाग समृद्ध करा’.

- Advertisement -

हेही वाचा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे ठेंगोडा येथे स्वागत


 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -