घरताज्या घडामोडीग्रामपंचायतींना कापडी मास्क, औषधी संच

ग्रामपंचायतींना कापडी मास्क, औषधी संच

Subscribe

जिल्हा परिषदेचे भाजप गटनेते डॉ.आत्माराम कुंभार्डे यांच्यातर्फे वाटप

नाशिक : मालेगावमध्ये करोनाचा विस्फोट झाल्यानंतर आता ग्रामीण भागातही रुग्ण आढळून येत आहेत. करोनाचा प्रसार होऊ नये म्हणून जिल्हा परिषदेचे भाजप गटनेते डॉ.आत्माराम कुंभार्डे यांनी तळेगाव रोही (ता.चांदवड) गटातील तीसगाव, हिरापुर, पिंपळद येथील ग्राम पंचायतींमध्ये कापडी मास्क, सॅनिटायझर, आरोग्य विषयक औषधी संच वाटप केले. त्याचा गावातील ग्रामस्त, आशावर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका व ग्राम पंचायत कर्मचार्‍यांना लाभ मिळणार आहे. डॉ.कुंभार्डे यांनी यावेळी ग्रामस्तांना सांगितले की, ज्या रुग्णांना सर्दी, ताप, खोकला व दम लागणे ही लक्षणे आढळल्यास त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करुन घ्यावे. तसेच वैद्यकीय अधिकार्‍यांमार्फत तपासणी करुन घेण्याच्या सूचना केल्या. तसेच हाताची स्वच्छता राखण्यासाठी किमान 40 सेकंद साबनाने हात स्वच्छ धुवावे. सामाजिक अंतर राखणे, खोकताना किंवा शिंकताना तोंड रुमालाने झाकावे, कापडी मास्कचा वापर करावा, गावात सोडीयम हायपोक्लोराइडची फवारणी करुन परिसर स्वच्छ ठेवण्याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी चांदवडचे गट विकास अधिकारी महेश पाटील, सरपंच मधुकर टोपे, उषा कांगुणे, कैलास खैरे, अरुण थोरात, शांताराम गांगुर्डे, अनिल कांगुणे, विलास गांगुर्डे, संतोष केदारे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -