Thursday, June 17, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र नाशिक ग्रामसेवकाच्या मनमानीला कंटाळून करंजवनच्या उपसरपंचासह ७ सदस्यांचे राजीनामे

ग्रामसेवकाच्या मनमानीला कंटाळून करंजवनच्या उपसरपंचासह ७ सदस्यांचे राजीनामे

स्थानिक ग्रामस्थ, महसूल विभाग आणि ग्रामसेवकांमध्येे झाले वाद

Related Story

- Advertisement -

दिंडोरी तालुक्यात काही कारणावरून स्थानिक ग्रामस्थ आणि महसूल विभाग तसेच ग्रामसेवकांमध्येे वाद निर्माण झाल्यामुळे येथील उपसरपंचासह ७ सदस्यांनी राजीनामे दिले.पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तक्रारींकडे दुर्लक्ष करत ग्रामसेवक यांना पाठीशी घालत असल्याने त्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून राजीनामा दिल्याचा आरोप उपसरपंच रवींद्र देशमुख व सदस्यांनी केला आहे.

दिंडोरी तालुक्यातील करंजवण ग्रामपालिकेच्या 10 सदस्यांपैकी उपसरपंचासह 8 सदस्यांनी राजीनामे दिल्यामुळे ग्रामपालिका बरखास्त होणार की काय अशी चर्चा करंजवण गावात सुरु झाली आहे. या सर्व राजीनामे सत्राला ग्रामसेवक अरुण आहेर जबाबदार असल्याचा आरोप उपसरपंच रविंद्र मोरे सदस्य नानासाहेब शार्दुल, विजय गांगोडे, श्रीपत खराटे, रामनाथ चतुर, मंगला वासले, लिलाबाई गांगोडे, सुरेखा मोरे व दिंडोरी पंचायत समिती सदस्या मालताताई खराटे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.

- Advertisement -

गेल्या 12 वर्षांपासून ग्रामसेवक करंजवण येथे कार्यरत आहेत. प्रशासनाला वेळोवेळी तोंडी व लेखी तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. दिंडोरीचे गटविकास अधिकारी भावसार जेव्हापासून दिंडोरीत आले, तेव्हापासून हे ग्रामसेवक करंजवण गावात दादागिरी करत असून, गटविकास अधिकारी त्यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप उपसरपंच व सदस्यांनी केला आहे. शासकीय कामात अडथळा केला म्हणून 353 केस दाखल करेल, अशी धमकी उपसरपंचांसह सदस्यांना देत आहेत. त्यामुळे सदस्यांनी सूचविलेली कामे वेळेत पूर्ण न करणे, उपसरपंच व सदस्यांविषयी चुकीची माहिती गावातील ग्रामस्थांना देवून गावात वाद लावणे, मासिक मिटिंगमध्ये उपसरपंच व सदस्यांना बोलू न देणे, सदस्यांनी केलेले ठराव चुकीच्या पद्धतीने प्रोसिडिंगला लिहिणे, ठरावावर हरकत किंवा सुधारणा करण्यास सांगितले. त्याचप्रमाणे 2018 पासून सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी 18 जुलै 2016 च्या शासकीय जीआरनुसार गावातील अतिक्रमित घराच्या कर आकारणी रजिस्टरला नोंदी कराव्या यासाठी वेळोवेळी सूचना व ठराव करूनही नोंदी केल्या नाही तर ग्रामविकास अधिकारी यांनी सदस्यांशी वाद घातला आहे.

तसेच गावात सीएसआर निधीतून विकासकामे होत असताना कंपनीने नेमलेल्या ठेकेदारावर दादगिरी करून त्यांना युनियनचा धाक दाखवून तुमचे लायसन रद्द करू, अशी धमकी ग्रामसेवक देतात. तसेच 26 मार्च 2021 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे संबधी ग्रामविकास अधिकार्‍यांविषयी तक्रार केली होती. या संदर्भात सात दिवसात चौकशी आदेश असताना दिंडोरी गट विकासअधिकारी यानी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली. त्यामुळे प्रशासन त्यास पाठीशी घालत असल्याचा आरोप होत आहे.

- Advertisement -

ग्रामसेवकांची बदली करावी
ग्रामसेवक हे कुणाचे ऐकण्याच्या मनस्थिती नसतात. गेल्या 12 वर्षापासून करंजवण येथे कार्यरत आहे. आता त्यांची त्वरित बदली करावी. प्रशासनाने सदर ग्रामविकास अधिकार्‍याची बदली करावी अशी लेखी तक्रार मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती मात्र त्यानीही दखल घेतलेली नाही.
– मालती खराटे,पंचायत समिती सदस्य, दिंडोरी

नियमबाह्य कामांसाठी दबाव
उपसरपंच यांनी नियमबाह्य कामकाज तसेच बेकायदेशीर कामे करण्यासाठी माझ्यावर तसेच सरपंच यांच्यावरही सातत्याने दबावतंत्र आणत अरेरावी केलेली असून मनमानी कारभार करण्याचा प्रयत्न केला. विकासकामे करताना प्रत्येक कामात अडथळे आणले आहे. सर्व बिनबुडाचे आरोप असून त्यात कोणतेही तथ्य नाही.
-अरुण आहेर,ग्रामविकास अधिकारी, करंजवन

- Advertisement -