घरमहाराष्ट्रनाशिकस्वत:चा बळी देऊन मालकाला नागापासून वाचविले

स्वत:चा बळी देऊन मालकाला नागापासून वाचविले

Subscribe

हृदयद्रावक घटनेने लोकांच्या डोळ्यात आसू

स्वार्थी माणसांच्या जगात एकमेकांविषयी प्रेम व निष्ठा लोप पावत आहे. एकीकडे एकमेकांचा जीव घेण्यासाठी आसुसलेली माणसे तर दुसरीकडे आपल्या धन्याच्या रक्षणासाठी स्वतःच्या प्राणांची आहूती देणार्‍या मुक्या जनावरांकडे पाहताना निसर्गाने माणसांमधली माणुसकी काढून ती या मुक्या जीवांमध्ये भरभरून जतन करून ठेवली आहे. याचे हृदयद्रावक पण तितकेच माणसाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे उत्तम उदाहण तालुक्यातील सरस्वती वाडी येथे पाहण्यास मिळाले आहे.

सरस्वतीवाडी ग्रामपंचायत हद्दीत मेधने वस्ती आहे. तेथील तरुण उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते प्रवीण मेधने कुटुंबासह शेतात वास्तव्यास आहे. त्यांनी शेताच्या राखणीसाठी डॉबरमॅन दीड वर्ष वयाची दोन कुत्रे पाळली होती. सोमवारी (१ जुलै) पहाटे चारला शेतातून कोब्रा जातीचा जहाल विषारी नाग बिळातून बाहेर आला. तो जवळच असलेल्या मेधने यांच्या घरात जाण्याचा प्रयत्न करत असताना मेधने यांनी पाळलेले राजा आणि राणी या दोन्ही कुत्र्यांचे लक्ष त्याच्याकडे गेले. दोन्ही कुत्र्याने क्षणाचाही विलंब न लावता नागराजा कडे धाव घेतली.

- Advertisement -

dolea sap

लहानपणापासूनच माणसांमध्ये वावरलेल्या या दोन्ही मुक्या जीवांना लढाईचे ज्ञान नसल्यामुळे त्यांनी नागराजाला समोरासमोर आव्हान दिले आणि यातच घात झाला. नागाने पूर्ण ताकदीनिशी दोघांवर प्राणघातक हल्ला केला. मात्र, कोणत्याही परिस्थितीत नागाला घरात जाऊ द्यायचे नाही, यासाठी दोघांनी दुप्पट ताकदीने नागावर हल्ला केला. क्षणार्धात त्याचे दोन तुकडे केले नागाची वळवळ बंद झालेली बघून राजा-राणीने आपल्या मालकांनी केलेल्या प्रेमाचे व दोन वेळच्या भाकरीचे ऋण फेडून आपले प्राण सोडले.

- Advertisement -

घटना निदर्शनास आल्यानंतर मेधने कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसला. पोटच्या पोराप्रमाणे वाढवलेल्या राजा राणीच्या निष्प्राण देहाकडे पाहून एका डोळ्यात असू तर दुसर्या डोळ्यात दोघांविषयी असलेला कृतज्ञ भाव दिसून येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -