घरमहाराष्ट्रनाशिकपुणे रेल्वे मार्गातील शेतकऱ्यांना पाच पट मोबदला देण्याचं पालकमंत्र्यांचे आश्वासन

पुणे रेल्वे मार्गातील शेतकऱ्यांना पाच पट मोबदला देण्याचं पालकमंत्र्यांचे आश्वासन

Subscribe

प्रकल्पग्रस्त दाखला मिळावा अशी शेतकर्‍यांकडुन मागणी

पुणे रेल्वे मार्गातील बाधित शेतकर्‍यांना त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात पाच पट मोबदला मिळवून देण्यात येईल. कुठल्याही शेतकर्‍यांवर अन्याय होऊ देणार नाही, शासन बाधित शेतकर्‍यांना योग्य ते सहकार्य करेल असे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक-पुणे रेल्वे मार्गातील बाधित शेतकर्‍यांच्या शिष्ठमंडळाला दिले.

नाशिक तालुक्यातील नानेगाव व परिसरातील बाधित शेतकर्‍यांच्या शिष्ठमंडळाने सोमवारी पालकमंत्री छगन भुजबळ यांची नाशिक येथील कार्यालयात भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. मौजे नाणेगाव येथे पुणे – नाशिक रेल्वे मार्गाचे भूसंपादन व अधिग्रहीत शेतजमिनीचे मोजणीचे काम सुरु आहे. हे भूसंपादन गावातील २१.५ हेक्टर बारमाही बागायती क्षेत्राचे होणार आहे. या क्षेत्रात द्राक्षे, कांदा, ऊस, फळझाडे व इतर बागायती नगदी पिके घेतली जातात. या प्रकल्पामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक व भौगोलिक नुकसान होणार असून बाधीत शेतकर्‍यांची जमिन बारमाही बागायती असल्यामुळे तसेच उदरनिर्वाहाचे साधन शेतीच असल्याने जमिनीचा योग्य मोबदला मिळावा, अशी मागणी केली आहे. यावेळी बाधित शेतकरी ज्ञानेश्वर शिंदे, केरू काळे, वासुदेव पोरजे, ज्ञानेश्वर काळे, अशोक आडके, योगेश काळे, प्रकाश आडके, सुकदेव आडके, मुकंद गोसावी, राजाराम शिंदे यांच्यासह बाधित शेतकरी उपस्थित होते.

- Advertisement -

या आहेत मागण्या :

रेल्वेलाईनमुळे शेतकर्‍यांच्या क्षेत्राची दोन ते तिन तुकडयांत विभागणी होणार असल्याने त्या संपूर्ण क्षेत्राची संमतीनुसार खरेदी करण्यात यावी, द्राक्षबागा निर्यातक्षम दर्जाच्या असल्याने त्या निर्यातदार शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे द्राक्षबाग शेती क्षेत्राची विभागणी झाल्यास उर्वरीत संपूर्ण द्राक्षबागेची व इतर साधन सामुग्रीची व बांधावरील फळझाडांचा योग्य मोबदला मिळावा. बाधित होणार्‍या पाईपलाईन २५ मीटरवर क्रॉसिंग होण्याकरीता व्यवस्था असावी, पाईपलाईन विहीर, बोअरवेल यांचा योग्य मोबदला मिळावा. बाधित होणार्‍या शेतकर्‍यांना प्रकल्पग्रस्त दाखला मिळावा व त्यांच्या कुटुंबातील एकास नोकरी मिळावी आदी मागण्या करण्यात आल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -