घरमहाराष्ट्रनाशिकघर खरेदीसाठी साधता येणार गुढीपाडव्याचा मुर्हूत, दस्त नोंदणी कार्यालय राहणार खुले

घर खरेदीसाठी साधता येणार गुढीपाडव्याचा मुर्हूत, दस्त नोंदणी कार्यालय राहणार खुले

Subscribe

नाशिक : गुढीपाडव्याच्या मुर्हूतावर घर घेणारकया ग्राहकांसाठी दस्त नोंदणीकरीता नोंदणी व शुल्क विभागाने शहरातील दुय्यम निबंधक कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे (दि.२२) रोजी गुढीपाडवा आणि शनिवार (दि. २५) रोजी सह दुय्यम निबंधक वर्ग २ नाशिक क्रमांक १ ते ७ ही कार्यालये दस्त नोंदणीसाठी सुरू ठेवण्यात येणार असल्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांनी सांगितले.

गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. लोकांचा असा विश्वास आहे की, एखाद्या शुभ दिवशी आयुष्यातील मोठा निर्णय अथवा एखाद्या गृहप्रवेश केल्याने त्यांचे भाग्य चांगले होते. त्यामुळे घर खरेदी व रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याला या दिवसाला विशेष महत्व आहे. मार्च एण्ड त्यात दस्त नोंदणी कार्यालयातील गर्दी बघता सुटीच्या दिवशीही कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिक शहरातील पक्षकार, बांधकाम व्यावसायिक व वकील संघाने केलेल्या मागणीनूसार गुढीपाडवा आणि शनिवार (दि.२५) रोजी दस्त नोंदणी कार्यालय सुरू ठेवण्यात येणार असून शासकीय सुटीच्या दिवशीही दस्त नोंदणी करता येणार असल्याचे दवंगे यांनी सांगितले.

- Advertisement -

गेल्या वर्षीही अशा प्रकारे कार्यालय सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याने हा निर्णय ग्राहकांसह, बांधकाम व्यवसायिकांसाठी जसा फायद्याचा ठरला तसाच तो राज्य शासनासाठीही.मागील दोन वर्षात शासनाने रेडीरेकनरचे द वाढवले नाहीत. नवीन आर्थिक वर्षात ते वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने अनेक जण भूर्दंड टाळण्यासाठी तातडीने दस्त नोंदणी करू लागले आहेत. यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयांत गर्दी वाढलेली दिसते. बांधकाम व्यावसायिकांच्या मते नव्या आर्थिक वर्षात रेडीरेकनरचे दर वाढू शकतात. एकदा स्टॅम्प डयुटी भरल्यानंतर सहा महिन्यांपर्यंत दस्ताची नोंदणी करता येते. त्यामुळे दस्त नोंदणी करता गर्दी दिसून येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -