घरउत्तर महाराष्ट्रनाशिकच्या ड्रग्जप्रकरणात गुजरात कनेक्शन

नाशिकच्या ड्रग्जप्रकरणात गुजरात कनेक्शन

Subscribe

संशयित शिवाजी शिंदे गुजरातहून द्यायचा नाशिकला ड्रग्जसाठी कच्चा माल, भूषण पानपाटील, अभिषेक बलकवडेला पोलीस कोठडी, नाशिक पोलिसांचा स्वतंत्र तपास सुरु, पोलीस शोधणार ड्रग्ज कारखान्याचे धागेदोरे

राज्यभर गाजलेल्या एमडी ड्रग्जप्रकरणात नवनवीन माहिती उघडकीस येत आहे. एमडी ड्रग्जसाठी लागणारे रसायन (कच्चा माल) गुजरातमधून नाशिकला पुरविण्याचे काम संशयित शिवाजी शिंदे करत असल्याचे समोर आले आहे. तो ड्रग्जमाफिया ललित पानपाटील याचा भाऊ भूषण पानपाटील व अभिषेक बलकवडे या दोघांच्या संपर्कात असल्याचेही उघडकीस आले आहे. त्यांचा ताबा नाशिक पोलिसांनी पुणे पोलिसांकडून मंगळवारी घेतला. नाशिक अंमली पदार्थविरोधी पथकाने दोघांना बुधवारी (दि.६) जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. यू. मोरे यांनी दोघांना १३ डिसेंबरपर्यंत आणि त्यांचा साथीदार संशयित शिवाजी शिंदे यास शनिवारपर्यंत (दि.९) पोलीस कोठडी सुनावली.

नाशिक अंमली पदार्थ विरोधी पथक (एनडीपीएस) आणि गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने सामनगाव १२ ग्रॅम एमडी तस्करी प्रकरणात सोलापूरातील एक कारखाना व गोदाम उद्ध्वस्त केले. संशयित सनी पगारे याच्या टोळीचा कोट्यवधी रुपयांचे एमडी तयार करण्याचा प्रकरणाचा त्यातून उलगडा झाला. तर वडाळा गावातील संशयित छोटी भाभी हिला एमडी पुरविणार्‍या संशयितांनाही बेड्या ठोकल्या. मात्र, शिंदे गावात मुंबईतील साकीनाका पोलिसांनी धाड टाकल्यानंतर दुसर्‍या दिवशी नाशिकरोड पोलिसांनी उद्ध्वस्त केलेल्या एमडीच्या गोदाम प्रकरणाचा तपास अद्याप प्रलंबित आहे. नाशिकमध्ये स्वतंत्र तपास करण्याबाबतची प्रक्रिया नाशिक पोलिसांनी सुरू केली आहे.

- Advertisement -

पथकाने भूषण पानपाटील व अभिषेक बलकवडे यांना ताब्यात घेत नाशिकमध्ये आणले. त्यामुळे नाशिकमधील ड्रग्ज प्रकरणातील इतर संशयितांसह आणखी काही मुद्दे उघड होण्याची शक्यता आहे. भूषण पानपाटीलच्या बाजूने अ‍ॅड. राजेश आव्हाड यांच्यातर्फे अ‍ॅड. सागर आंधळे आणि अभिषेक बलकवडेच्या अ‍ॅड. यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -