देशभरात दागिन्यांवर हॅालमार्किंग बंधनकारक

केंद्र सरकारने लागू केला नियम

Hallmark jewellery

देशभरात मंगळवारपासून सोन्याच्या दागिन्यांसाठी हॅालमार्किंग बंधनकारक झाले आहे. केंद्र सरकारने हा नियम लागू केला आहे. यापुढे ग्राहकांना हॅालमार्क असलेले दागिनेच उपलब्ध होणार आहेत. हॅालमार्किंगमुळे सोन्याची शुद्धता ओळखणं सोपं होणार असून त्यातून होणाऱ्या फसवणुकीला चाप बसणार आहे. हॅालमार्किंग दागिन्यांची विक्री आणि त्यावर देखरेख ठेवण्यासाठी केंद्र सरकारने एका समितीची स्थापना केली आहे. या समितीकडे ग्राहकांना हॅालमार्किंगसंबधी तक्रार असल्यास त्याची दाद मागता येईल. देशात तात्काळ हॅालमार्क दागिने विक्रीसाठी उपलब्ध व्हावेत, असे आवाहन वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी केले.