घरमहाराष्ट्रनाशिकअंजेनरीला दर्शनासाठी हनुमानभक्तांची रिघ

अंजेनरीला दर्शनासाठी हनुमानभक्तांची रिघ

Subscribe

हनुमान जन्मस्थान असलेल्या श्री क्षेत्र अंजनेरी गडावर हनुमान जन्मोत्सव पारंपारिक पद्धतीने झाला.

हनुमान जन्मस्थान असलेल्या श्री क्षेत्र अंजनेरी गडावर हनुमान जन्मोत्सव पारंपारिक पद्धतीने झाला. यावर्षी भाविकांची गर्दी गत काही वर्षाच्या तुलनेत कमी आढळली आहे. उन्हाचा तडाखा अशात निवडणुकीचे वातावरणामुळे कदाचित गडावर येणार्‍या भक्तांच्या संख्येत घट झाली असावी, असा अंदाज व्यक्त होत आहे.

वर्षानुवर्ष नित्यनेमाने येणार्‍या भाविकांनी आवर्जून हजेरी लावल्याने गडाचा परिसर गुरुवार रात्रीपासूनच गजबजला होता. रात्री गडावर मुक्कामी असलेल्या भाविकांनी आणि पहाटेपासूनच गडावर हजर भक्तांनी सूर्योदयाच्या सुमारास हनुमान जन्मौत्सव साजरा केला. या वेळेस झालेल्या आरतीस भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अंजनेरी आणि परिसरातील काही दानशूर भाविक उपक्रम राबवणारे मंडळ यांनी लाडूचा प्रसाद ,पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आदींचे वाटप केले. दिवसभर गडावर जाणार्‍या भाविकांचा ओघ सुरू होता. अंजनेरीपासून ते गडाच्या पायथ्यापर्यंत जाणारा रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याने भाविकांना समस्यांना तोंड द्यावे लागले. या मार्गावर प्रकाशाची व्यवस्था करणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष केले जाते. यामुळे या वर्षी देखील रात्री अंधारात मार्गक्रमण करत असताना भाविक धडपडत होते. वाहनांनी पायथ्यापर्यंत जात असताना होणारी कसरत दमछाक करणारी होती.

- Advertisement -

दरम्यान, गडावर पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष आहे. येथील ध्यानस्त भव्य हनुमानमुर्तीसमोर भाविक तल्लीनतेने भजन करताना दिसून येत होते. ठानापती ब्रम्हगीरी महाराज अशोकबाबा यांच्या अश्रमात उत्सव झाला असून बाल हनुमान व अंजनीमाता दर्शनासाठी भाविकांची रिघ लागली होती. त्र्यंबकेश्वर शहरात ग्रामदैवत हनुमान मंदिर, मौनी बाबा आखाडा दक्षिणमुखी हनुमान, आदिसह हनुमान मंदिरास विद्युत रोषणाई करण्यात आली होती. येथे महाप्रसादाचे वाटप सुरू होते. येथून जवळच असलेल्या बेझे येथे शिलाई माता यात्रोत्सव उत्साहात झाला आहे.
पंचवटीतील पंचमुखी हनुमान मंदिरातील हनुमंतरायाची विलोभनीय मुर्ती.

एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान

 शक्तीचे आणि भक्तीचे प्रतिक असलेल्या पवनपुत्र हनुमान जन्मोत्सव पंचवटी परिसरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली हनुमान जन्मोत्सव निमित्त पंचवटी परिसरातील विविध ठिकाणच्या हनुमान मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे ही आयोजन करण्यात आले होते. पंचवटीतील पंचमुखी हनुमान मंदिरात प्रभातकाळी हनुमानाचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी मंदिराचे प्रमुख महंत भक्तीचरणदास महाराजांच्या हस्ते महापूजा करण्यात आली जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त संपुर्ण मंदीर फुलमाळांनी सजविण्यात आले होते त्याप्रमाणे मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती मंदिरात हनुमंतरायाच्या दर्शनासाठी भाविकांची दिवसभर गर्दी होती दरम्यान पंचमुखी हनुमान मंदिरात महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. त्याच प्रमाणे काट्यामारुती मंदिर, झंडु दादा हनुमान मंदिर, तसेच गंगाघाटावरील दुतोंड्या हनुमान मंदीर आदीसह पंचवटी परिसरातील विविध ठिकाणच्या हनुमान मंदिरात जन्मोत्सव साजरा करण्यात आला ठिक ठिकाणी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -