नाशिकच मानसिक स्वास्थ बिघडलंय?; शहरात दोन जणांची गळफास घेत आत्महत्या

फाशी

नाशिक : शहरात दिवसेंदिवस एकटेपणा, प्रेमभंग, वाढत्या अपेक्षा, छळ व नैराश्यातून आबालवृद्धांमध्ये गळफास व विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याच्या घटनांत वाढ होत आहे. वाढत्या आत्महत्येच्या घटनांमुळे कुटुंबीय व नातेवाईकांमध्ये चितेंचे वातावरण आहे. शहरात शनिवारी (दि.२५) एकाच दिवशी दोन जणांनी जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी अंबड व आडगाव पोलीस ठाण्यांत नोंद करण्यात आली आहे.

भूषण धनराज पाटील (२८, रा. दत्तनगर, चिंचोळे, अंबड, नाशिक), आलम अब्दुल मणियार (वय ५५, रा. ओढा, ता. जि. नाशिक) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. पहिल्या घटनेनुसार, भूषण पाटील याने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी भूषणला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करत त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत.

दुसर्‍या घटनेत, आलम मणियार यांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी भूषणला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करत त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास आडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार कहांडळ करत आहेत.