घरमहाराष्ट्रनाशिकछत्रपतींची पगडी बनविली नाशिकच्या कारागिराने

छत्रपतींची पगडी बनविली नाशिकच्या कारागिराने

Subscribe

पंतप्रधानांनीही केले कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भर उदनराजे भोसले यांनी दिलेली छत्रपतींची पगडी ही नाशिकच्या एका कारागिराने बनविली. छत्रपतीची ही पगडी पंतप्रधानांचा सर्वोच्च सन्मान ठरला. पण, या पगडीला आकार देणारे कारगिरही नाशिकच्या पिंपळगाव बसवंत येथील असल्याने, त्या कारागिराच्या कलेच्या शिरपेचातही मानाचा तुरा खोवला गेला. त्या कारागिराचे नाव योगेश डिंगोरे असे होते.

नाशिककला पंतप्रधानांची जाहीरसभा होणार आणि या सभेत पंतप्रधानांच्या उपस्थितीत उदयनराजे भोसले यांचा भाजपचा पक्षप्रवेश करून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार, याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना उदयनराजे यांच्या हस्ते पगडी परिधान करून त्यांचा सत्कार करण्यात आला. ही पगडी आपल्या आयुष्यातील सर्वाच्च क्षण असल्याचे पंतप्रधानांनी तेव्हा म्हटले. त्याचवेळी या पगडी बनविण्यार्‍या कारागिराचेही नावही उज्वल झाले. छत्रपतींची शाही पगडी ही पिंपळगाव येथील योगेश डिंगोरे यांनी बनवून द्यावी, यासाठी उदयनराजे भोसले यांचे मेव्हणे रत्नशिलराजे यांनी 18 सप्टेंबरला ऑर्डर दिली होती. एका दिवसात ही पगडी बनवून देण्याचे निश्चित झाले होते. कारण ही पगडी पंतप्रधानांना भेट देण्यात येणार असल्याचे योगेश यांना सांगण्यात आले होते.

- Advertisement -

त्यामुळे त्यांनी पूर्ण कौशल्य पणास लावून छत्रपतींची पगडी बनवून दिली. ही पगडी भर सभेत पंतप्रधान मोदींना उदयनराजे भोसले यांनी अर्पण करीत सत्कार केला.या क्षणाचा नंतर पंतप्रधानांनी आपल्या भाषणात गौरवोद्गार काढत सर्वोच्च सन्मान असल्याचे म्हटले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -