Sunday, August 1, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र नाशिक एचसीजीला, एनएबीएच, एनएबीएल सर्टिफिकेशन

एचसीजीला, एनएबीएच, एनएबीएल सर्टिफिकेशन

Related Story

- Advertisement -

कर्करोग निदान व उपचार क्षेत्रात नावाजलेल्या शहरातील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरला वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च अशा एनएबीएच व एनएबीएल सर्टिफिकेशन मिळाले आहे. अशा स्वरुपाचा बहुमान मिळविणारे हे उत्तर महाराष्ट्रातील पहिले व एकमेव हॉस्पिटल आहे, अशी माहिती एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक तथा चीफ ऑफ सर्जिकल ऑन्कॉलॉजी अ‍ॅण्ड रोबोटीक सर्विसेस प्रा. डॉ. राज नगरकर यांनी दिली.

रुग्णालयात उत्तर महाराष्ट्रासह, दक्षिण गुजरातमधूनही रुग्ण उपचारासाठी मोठ्या संख्येने येत असतात. गुणवत्ता टिकून राहावी, यासाठी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधांचे मानांकन करण्यास प्राधान्य दिला गेला आहे.गेल्या २०१२ मध्ये एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरने एनएबीएस सर्टिफिकेशन प्राप्त करताना दर्जेदार सुविधेचे महत्त्व अधोरेखित केले होते. तेव्हा राष्ट्रीय पातळीवर असे सर्टिफिकेशन प्राप्त करणारे पहिल कॅन्सर हॉस्पिटल होण्याचा बहुमान मिळविला होता. आता आणखी एक दमदार पाऊल पुढे टाकत एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरचे मुंबई-आग्रा महामार्गावरील नवीन युनिटला एनएबीएच सर्टिफिकेशनमिळाले आहे.तसेच येथील लॅबरोटरीला एनएबीएल सर्टीफीकेशनचा बहुमान मिळाला आहे. अशा दोन्ही स्वरुपाचे सर्टीफीकेशन मिळविणारे एचसीजी मानवता कॅन्सर हे उत्तर महाराष्ट्रातील पहिले व एकमेव रुग्णालय असल्याचे समाधान डॉ.नगरकर यांनी व्यक्त केले. पत्रकार परिषदेस सीओओ अमन सिंग अहलुवालिया, पॅथोलॉजीच्या एचओडी व लॅब डायरेक्टर डॉ. सुचिता गंधे, मार्केटिंग हेड स्वप्नील आवळे, क्वॉलिटी हेड संजय बोरकर, पॅथॉलॉजीचे क्वॉलिटी मॅनेजर मयूर केदारे उपस्थित होते.

- Advertisement -