घरताज्या घडामोडीकोकेनसाठी त्याने रस्त्यावर भीक मागितली, नशेसाठी नाशिककरांनाही फसवले

कोकेनसाठी त्याने रस्त्यावर भीक मागितली, नशेसाठी नाशिककरांनाही फसवले

Subscribe

लंडनस्थित गुजराथी कुटुंबातील मुलगा शाळेत जात असताना वयाच्या अकराव्या वर्षीच विविध व्यसनांच्या चक्रात अडकला. नाशिकमध्ये राहतानाच तो व्यसनाधीन झाला. पुढे लंडनला गेल्यावर या व्यसनांनी त्याला अक्षरश: जखडले. व्यसनांसाठी पैसे खिशात नव्हते म्हणून त्याने भीक मागायलाही मागे-पुढे बघितले नाही. लोकांना फसवून त्याने पैसे मिळवले आणि त्यातून आपल्या व्यसनाची तल्लफ भागवली.

मूळचे गुजराथी, पण लंडनस्थित असलेले कुटुंब. मुलाचे वडील मल्टिनॅशनल कंपनीत अकाउंटंटची नोकरी करतात, तर आई ऑप्टिशियन आहे. सुरुवातीला हे कुटुंब नाशिकमध्येच रहायचे. त्यानंतर ते लंडनमध्ये स्थायिक झाले. कुटुंबातील एकूलता एक मुलगा शाळेत असतानाच व्यसनांच्या आहारी गेला. त्यानंतर तो लंडनला गेल्यावर त्याने वयाच्या अवघ्या ११व्या वर्षी बिअरचा घोट घेतला. फारसे समजत नसल्याने मित्र सांगतील तसे तो करायचा. काही दिवसांत तो कॅनाबीस (गांजाचा प्रकार) ओढायला लागला. हळूहळू गांजाचे मॅरोवाना आणि हॅश हे प्रकारही टेस्ट केले. वर्गातील मोठी मुले गांजा आणून देत. काही काळानंतर हा पदार्थ आवडायला लागला. त्यानंतर त्याला खासगी शाळेत टाकले. तेथे शाळेतून तो बोर्डिंगमध्ये जात. तेथे मोकळीक मिळाल्याने ड्रगच्या पूर्णत: आहारी गेला.

- Advertisement -

बारावीत शिक्षणातील रस कमी झाला आणि व्यसनांची गोडी वाढली. यानंतर ओळख झाली ती स्पीड व एक्सटसीची. हे महाभयंकर ड्रग मानले जाते. यातून एनर्जी वाढते असा समज असल्याने ते घेऊन तोतो पबमध्ये रात्र-रात्र डान्स करायचा. मात्र या व्यसनाविषयी त्याच्या आई-बाबांना हे ठाऊक नव्हते. मुलगा वयात आलाय, इथल्या संस्कृतीप्रमाणे थोडीफार मजा करीत असेल असा त्यांचा समज होता. पण, त्याचाच फायदा उचलत तो व्यसनांच्या आहारी गेला. काही कालावधीनंतर तो पूर्णत: आहारी गेला. व्यसनासाठी मारामार्‍या करु लागला. त्यामुळे घरापर्यंत पोलिस आणि डॉक्टर्स आले. त्यांनी मेंटल हेल्थ क्लिनिकमध्ये दाखल केले. सहा महिने तेथे राहिल्यावर बाहेर आला आणि विमा कंपनीत कामाला लागला. पण, तेथेही कोकेनने पिछा सोडला नाही. तेथून त्याला मुंबईला उपचारासाठी पाठविले; परंतु तेथेही सुधारणा झाली नाही. त्यानंतर तो पुन्हा लंडनमध्ये गेला. पैसे मिळविण्यासाठी भीक मागायला लागला. लोकांना फसवायला लागला.

वेळप्रसंगी चोर्‍याही तो करायचा. एका चोरीत पकडला गेल्याने त्याला न्यायालयात उभे करण्यात आले. तेथे त्याने एकच मागणी केली ‘आय वॉण्ट टू चेंज’ त्यानंतर त्याने मुंबईत पुन्हा दाखल करण्यात आले. तेथून नाशिकमध्ये आणण्यात आले. येथे हिंदुस्थाननगरला लाइफ रिहॅबीलेशन सेंटरमध्ये त्याने मानसिक उपचार घेतले. आता तो पूर्णत: बरा आहे. नाशिकसारखे छोटे शहर असो वा लंडन सारखे मोठे शहर.. व्यसनांची तीव्रता माणसाचा घातच करते, असे हा तरुण सांगतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -