घरक्राइम'बहीणीकडे वाईट नजर का टाकतो' विचारण्यासाठी गेला; झटापटीत जीवच घेतला

‘बहीणीकडे वाईट नजर का टाकतो’ विचारण्यासाठी गेला; झटापटीत जीवच घेतला

Subscribe

नाशिक : म्हसरूळ पोलिस ठाणे हद्दीतील वाढणे कॉलनी भागातील एका रो-हाऊस बांधकामाच्या साईटवर बिगारीकाम करणार्‍या कामगाराने त्याच साईटवर काम करणार्‍या वॉचमनचा खून केल्याची घटना समोर आली आहे. वॉचमनने बिगारी कामगाराच्या बहीणीवर वाईट नजर टाकल्याच्या कारणावरून त्या दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाली. हाणामारीच्या दरम्यान वॉचमनच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेत मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेल्या ४० वर्षीय सतलाल मुकरी प्रसाद या वॉचमनाचा मृत्यू झाला आहे. बिगारीकाम करणार्‍या मूळच्या दिंडोरी तालुक्यातील ननाशी येथील रहिवासी असलेल्या २७ वर्षीय संशयित योगेश पंढरीनाथ डंबाळे वयास अटक करण्यात आली आहे.

म्हसरूळच्या वाढणे कॉलनी परिसरात सुरू असलेल्या रो-हाऊसच्या साईटवर कामगार तसेच वॉचमनसाठी पत्र्याचे शेड बनवण्यात आले आहेत. याठिकाणी बिगारीकाम करणारा योगेश डंबाळे आणि त्याची बहीणही कामगार म्हणून काम करतात व तात्पुरत्या स्वरुपात वास्तव्यास आहेत. याचठिकाणी सतलाल मुकरी प्रसाद  याची वॉचमन म्हणून नियुक्ती आहे. मागील काही दिवसापासून सतलाल बिगारी काम करणार्‍या डंबाळेच्या बहीणीकडे वाईट नजर ठेऊन होता. ही बाब डंबाळे याच्या लक्षात आली. गुरुवारी (दी.३) रात्री मद्यधुंद अवस्थेत बिगारी योगेश डंबाळे याने सतलाल मुकरी प्रसाद याचे पत्र्याचे शेड गाठले. ‘माझ्या बहीणीकडे वाईट नजर टाकतो का?’ असा जाब विचारात त्याच्यासोबत भांडणास सुरवात केली. टी दोघांमधील वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. याच दरम्यान सतलाल खाली पडून त्याच्या डोक्याला दुखापत झाली. तश्याच अवस्थेत सतलाल  रात्रभर शेडमध्ये पडून राहिला. सकाळी तो बेशुद्ध असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डाॅक्टरांनी मृत घोषित केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -