घरमहाराष्ट्रनाशिकआरोग्य धोक्यात : शहरभरात डेंग्यूचे थैमान

आरोग्य धोक्यात : शहरभरात डेंग्यूचे थैमान

Subscribe

 शहरात कोरोना ओसरत असला तरी आता साथीच्या रोगांपैकी डेंग्यूने हैदोस घालण्यास सुरुवात केली आहे. सिडको व सातपूर भागात दोन दिवसात 65 हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. डेंग्यूला आळा घालण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने पथके तयार केली आहेत. त्यांच्यामार्फत सर्वेक्षण व धूर फवारणी केली जात आहे.

शहरात डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडू लागले आहेत. सातपूर आणि सिडको परिसरातील नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेतल्यानंतर रुग्णांचे आकडे समोर आले आहेत. सातपूर आणि सिडकोमध्ये डेंग्यूचे एकूण ६५ रुग्ण आढळले आहेत. डेंग्यूला आळा बसावा, यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने दहा पथके तयार केली असून, या भागात विविध ठिकाणी रवाना केली आहेत. त्यांच्याकडून घरोघरी जाऊन रक्ताचे नमुने घेतले जात आहेत. शिवाय जनजागृतीवर भर दिला जाणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पाणी साठते आहे, अशा जागा शोधून त्यावर फवारणी करण्यात येत आहे. पंक्चरच्या दुकानाबाहेर साठवणूक केलेले बिनकामाचे टायर जप्त करण्यात आले आहेत. तसेच संपूर्ण विभागात साफसफाई करण्यात येत असून, सार्वजनिक शौचालये, स्वच्छतागृहांची स्वच्छता केली जात आहे. जागोजागी डासांची उत्पत्ती होणार नाही, यासाठी खबरदारी घेतली जात असून, परिसरात औषध फवारणी करण्यात
येत आहे.

- Advertisement -

ही आहेत डेंग्यूची लक्षणे

डेंग्यू हा एक प्रकारचा व्हायरल ताप आहे. डेंग्यू मच्छर चावल्याने होतो. डेंग्यूचा प्रसार करणारे मच्छर घरातील स्वच्छ पाण्यात जन्म घेतात आणि त्यातच अंडीही घालतात. तसे कूलरमध्ये साठलेलं पाणी, कुंड्यांमध्ये साचलेलं पाणी किंवा टाकीत डेंग्यू जन्मास येतात. डेंग्यूचा मच्छर चावल्यानंतर ३ ते ६ दिवसांपासून डेंग्यूच्या तापाची लक्षणे दिसू लागतात. डेंग्यू मच्छर चावलेल्या रुग्णाला अचानक ताप येतो. भरपूर थंडी वाजून येते. रुग्णाचं डोके मोठ्या प्रमाणात दुखू लागते. सांध्यामध्ये वेदना आणि कमकूवतपणा सहन न झाल्याने अस्वस्थता येते. घशात कायम दुखणं सुरु असते. हे कधी सौम्य तर कधी मोठ्या प्रमाणात असतात. मान, छाती व चेहर्‍यावर गुलाबी रंगाचे पट्टे येतात. दरम्यान, रुग्णाला काहीच खावसं वाटत नाही. सतत उलटीसारखं वाटत राहते.

Dr. Nagargoje NMCनाशिक शहरामध्ये डेंग्यूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केली जात आहे. सर्वाधिक सातपूर आणि सिडकोमध्ये रुग्ण आढळून आले आहेत. या ठिकाणी धूर फवारणी केली जात आहे. नागरिकांनी डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी पाणी साचते अशी भांडी, भंगार म्हणून टेरेसवर ठेवलेले साहित्य रिकामे ठेवावेत.
               – बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधिकारी, नाशिक मनपा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -