घरताज्या घडामोडीनाशिक जिल्ह्यासाठी 2.75 कोटींचे आरोग्य साहित्य घेणार

नाशिक जिल्ह्यासाठी 2.75 कोटींचे आरोग्य साहित्य घेणार

Subscribe

जिल्हा परिषद स्थायी समितीचा निर्णय; व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे दिली मंजुरी

नाशिक : मालेगावसह ग्रामीण भागातही करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने येथील खासगी डॉक्टरांना विश्वासात घेण्याची वेळ आली आहे. त्यांच्या मदतीशिवाय करोनाचे संकट संपणारे नाही. ग्रामीण रुग्णालयांच्या मागणीनुसार यापुढे आरोग्य विभागाने साहित्य खरेदी करावी. यापूर्वीच 25 लाख रुपयांची खरेदी केली असून लवकरच अडीच कोटी रुपयांचे आरोग्य साहित्य खरेदी केले जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांनी जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्‍यांना दिली.
जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे शुक्रवारी (दि.8) झाली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष डॉ. सयाजी गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांसह समिती सभापती व सदस्य सहभागी झाले. आरोग्य सभापती सुरेखा दराडे यांनी जिल्हाचा आढावा घेतला. आरोग्य विभाग फक्त जिल्हा स्तरावरुन साहित्याची खरेदी करते. मात्र, ग्रामीण भागात कोणत्या गोष्टींचा आवश्यकता आहे, याचाही मागोवा घेतला पाहिजे. तालुका आरोग्य अधिकार्‍यांना विचारुन आवश्यकता असलेल्या साहित्याची खरेदी करण्याचे आदेश सभापती दराडेंनी दिले. मालेगाव पाठोपाठ आता येवला, निफाड, नांदगाव तालुक्यातही रुग्णांची संख्या वाढत आहे. कृषी सभापती संजय बनकर यांनी कृषी विभागाची माहिती दिली. कृषी सेवा केंद्रांमध्ये शेतकर्‍यांची गर्दी होणार नाही. यासाठी शेतकर्‍यांना यंदा बांधावर बियाणे व रासायनिक खते पुरवले जाणार आहेत. सध्या खतांचा व बियाण्यांचा पुरेसा साठा शिल्लक असल्याचे कृषी विकास अधिकारी रमेश शिंदे यांनी सांगितले. जिल्हा परिषदेत सध्या 33 टक्के कर्मचारी उपस्थित राहतात. परंतु, ज्या कर्मचार्‍यांची आवश्यकता आहे. ज्या कर्मचार्‍यांकडे लोकप्रतिनिधींची कामे अडतात त्यांना कार्यालयात बोलवले पाहिजे. ज्यांची आवश्यकता नाही, अशा कर्मचार्‍यांना बोलवू नये, अशा सूचना अध्यक्ष क्षीरसागर यांनी केल्या. ग्रामीण पाणी पुरवठा व आरोग्य विभागाने लॉकडाऊनच्या काळात चांगले काम केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. भाजपचे गटनेते डॉ.आत्माराम कुंभार्डे यांनी आरोग्याविषयी ग्रामीण भागातील डॉक्टरांना विश्वासात घेण्याची मागणी केली. राज्य सरकारने निधी खर्चाविषयी दिलेला आदेश हा 2020-21 या आर्थिक वर्षासाठी लागू आहे. त्यामुळे 2019-20 या चालू वर्षातील निधी खर्च करता येऊ शकतो. हाती असलेला निधी तत्काळ खर्च करण्यासाठी त्वरीत उपाय योजना केल्या पाहिजे. तसेच 2018-19 या आर्थिक वर्षातील 85 टक्के निधी खर्च झाला आहे. मार्चअखेर हे आर्थिक वर्ष असले तरी करोनामुळे यंदा मे अखेरपर्यंत हा निधी खर्च करता येणार आहे. त्यामुळे अजून पाच ते दहा टक्के निधी खर्च होईल. जेणेकरुन कमित कमी निधी अखर्चित राहून शासनाकडे परत जाईल, यादृष्टीने प्रयत्न करण्याचे आवाहन डॉ.कुंभार्डे यांनी अधिकार्‍यांना केले. यावेळी सभापती अश्विनी आहेर, सुशिला मेंगाळ यांसह समिती महेंद्रकुमार काले, यतिंद्र कदम सहभागी झाले.
 ठळक मुद्दे
-शेतकर्‍यांना बांधावर मिळणार बियाणे, रासायनिक खते
-आरोग्य विभागाला पीपीई किट, मास्क देणार
-चालू आर्थिक वर्षात 10 टक्के निधी राहणार अखर्चित
-अत्यावश्यक कर्मचार्‍यांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश
-ग्रामीण पाणीपुरवठा, आरोग्य विभागाचे कार्य कौतुकास्पद
-विकासा पेक्षा आरोग्याला महत्व देणार

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -