घरताज्या घडामोडीआरोग्य विद्याशाखेच्या परीक्षा 4 ऑगस्टपासून

आरोग्य विद्याशाखेच्या परीक्षा 4 ऑगस्टपासून

Subscribe

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम परीक्षांचे वेळापत्रक जाहिर

नाशिक  करोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आलेल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षांचे वेळापत्रक अखेर जाहीर झाले आहे.आरोग्य विद्याशाखा अभ्यासक्रमाच्या परीक्षेस दि.4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे.परीक्षांचे वेळापत्रक 45 दिवस अगोदर जाहिर करणेबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आदेश दिले होते.

विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षा टप्याटप्प्याने घेण्यात येणार आहेत. उन्हाळी सत्रातील पदवीपूर्व अंतीम वर्ष अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे वेळापत्रक दि. 5 जून रोजी जाहिर करण्यात आले होते. या वेळापत्रकात एक दिवसाचाही खंड नव्हता. त्यामुळे या वेळापत्रकात एक दिवसाचा खंड देऊन दि.16 जुलैऐवजी दि.3 ऑगस्टपासून नियोजन केले आहे. विद्यापीठाचे पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये अ‍ॅलोपॅथी अभ्यासक्रमाच्या परीक्षेचे वेळापत्रक वगळता अन्य सर्व अभ्यासक्रमांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दंत, होमिओपॅथी, आयुर्वेद, युनानी, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, नर्सिंग, स्पीच लॅग्वेज पॅथोलॉजी या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. लेखी परीक्षा झाल्यानंतर तातडीने त्यांच्या प्रक्टिकल परीक्षा घेण्यात येणार असल्याचे विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ.अजित पाठक यांनी सांगितले. सर्व विद्याशाखांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केले आहे.

- Advertisement -

..
या परीक्षा 18 ऑगस्टपासून
बी.एस्सी इन पॅरामेडिकल टेक्नोलॉजी, डिप्लोमा इन पॅरामेडिकल टेक्नोलॉजी, मास्टर इन पब्लीक हेल्थ न्युट्रीशन, एम.बी.ए. (हेल्थ केअर अ‍ॅडमिनिस्ट्रेशन), एम. एस्सी. (फार्मा. मेडिसिन), पी.जी.डी.एम.एल.टी., बॅचलर इन ऑप्टोमेट्री, डिप्लोमा इन ऑप्टोमेट्री, डिप्लोमा इन ऑप्थालमिक, सर्टीफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी या अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षा दि. 18 ऑगस्टपासून सुरु होणार आहेत.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -