घरताज्या घडामोडीआरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या ‘पीजी’ परीक्षा 15 जूनपासून

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या ‘पीजी’ परीक्षा 15 जूनपासून

Subscribe

कोरोनामुळे वेळापत्रकात बदल; एमडी, एमएस, डिप्लोमा, एम.एस्सीचा समावेश

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे घेण्यात येणार्‍या वैद्यकीय पदव्युत्तर पदवी (पीजी) अभ्यासक्रमाच्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. एम. डी., एम. एस., डिप्लोमा, एम.एस्सी आदी अभ्यासक्रमाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षा आता दि.15 ते 22 जून या कालावधीत होणार असल्याचे विद्यापीठाने कळवले आहे.
विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील या परीक्षांचे दि.12 मे पासून नियोजन करण्यात आले होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा  तुर्त स्थगित करण्याचे आवाहन विद्यापीठाला करण्यात आले होते. मार्डचे अध्यक्ष डॉ. राहूल वाघ व इतर पदाधिकार्‍यांनी विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देषमुख यांना यासंदर्भात निवेदन दिले होते. कोरोना विषाणूचा संसर्गास अटकाव करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. रुग्णसेवेसाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांची मदत होणार आहे. या अनुषंगाने मे उन्हाळी सत्रातील वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.दिलीप म्हैसेकर यांनी सांगितले.

सोशल मिडीयावरील संदेश चुकिचे
विद्यापीठाच्या पदव्युत्तर परीक्षा वेळापत्रक बदलाविषयी सोशल मिडीयाव्दारे सातत्याने चूकीचे संदेश पसरविण्यात येत आहेत. यापासून विद्यार्थी व पालकांनी सावध रहावे. परीक्षा व अन्य घटनांबाबत बनावट संदेश तयार करणार्‍यांवर पोलीस  कठोर कारवाई करत आहेत. वेळापत्रकातील बदल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

सुधारित वेळापत्रक
पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाचा पेपर-1 (दि.15 जून) रोजी, पेपर-2 (दि.17), पेपर-3 (दि.19) आणि पेपर-4 (दि.22) जून रोजी सकाळी 11 ते दु. 2 या वेळेत निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहेत. तसेच सत्र-2 च्या उन्हाळी परीक्षेसाठी परीक्षा अर्ज विना विलंब शुल्कासहीत सादर करणेसाठी दि. 5 मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विलंब शुल्कासह दि. 8 मे आणि अति विलंब शुल्कासहीत दि. 12 मेपर्यंत अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -