घरताज्या घडामोडीआरोग्य कर्मचार्‍यांना दिवसाला लागतात 10 हजार मास्क

आरोग्य कर्मचार्‍यांना दिवसाला लागतात 10 हजार मास्क

Subscribe

जिल्हा आरोग्य विभागातर्फे 15 दिवसांचा साठा; दीड लाख मास्कची केली खरेदी

नाशिक : करोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागातर्फे प्रतिबंधात्मक उपायोजना केल्या जात आहेत. त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रातील डॉक्टर, नर्स व इतर कर्मचार्‍यांना प्रत्येक दिवसाला 10 हजार मास्क लागतात. काही मास्क हे एकदाच वापरात येतात तर, कापडी मास्क धुवून पुन्हा वापरले जात आहेत. जिल्ह्यात विदेशवारी करुन आलेल्या 89 व्यक्तींवर आरोग्य विभाग नजर ठेवून आहे. त्यांच्या घरी जावून नियमित आरोग्य तपासणी केली जात असून, त्यांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.  ग्रामीण भागातील अनेक लोक नोकरी, व्यवसायानिमित्त पुणे, मुंबई या सारख्या शहरात राहतात. त्यांनी गावाकडे धाव घेतल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक जिल्ह्यात साधारणत: 680 प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र आहेत. तसेच तालुका स्तरावरील 40 ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांमार्फत आरोग्य सेवा पुरवली जाते. येथील डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय व शिपाई आदी तत्सम कर्मचार्‍यांना आरोग्य विभागामार्फत सुरक्षा कीट, मास्क, सॅनिटायझर व लिक्विड सोप पुरवण्यात आले आहे. पुढील 15 दिवस पुरेल (दीड लाख मास्क) इतका साठा करण्यात आला आहे. त्यानंतर महिन्याभराचा साठा आरोग्य विभागामार्फत खरेदी केला जाईल.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -