निफाड, दिंडोरी तालुक्यात मुसळधार पावसाचा तडाखा, द्राक्षबागा पाण्यात

द्राक्षबागांमध्ये गुडघ्यापेक्षा जास्त पाणी साचलं, रस्तेही जलमय

Materewadi

नाशिक शहरात कमी-अधिक कोसळणाऱ्या पावसाने आता नांदगाव पाठोपाठ निफाड आणि दिंडोरी तालुक्यातही थैमान घातलंय. आज दुपारी अचानक कोसळलेल्या मुसळधार पावसाने या दोन्हीही तालुक्यांतल्या अनेक गावांना झोपडलं.

कोकणगाव, कसबे-सुकेणेसह पूर्व भागात झालेल्या या पावसाने द्राक्षबागांमध्ये पूरासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. गेल्या आठवडाभरापासून निफाड तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. उत्तर पूर्व भागानंतर दोन दिवसांपासून पश्चिम पट्ट्यात हा पाऊस कोसळतोय. दरम्यान, दिंडोरी तालुक्यातील मातेरवाडीत आज दुपारी ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने नद्या-नाल्यांचं पाणी रस्त्यावर येऊन वाहतूक ठप्प झाली होती. द्राक्षबागांमध्ये गुडघ्यापेक्षा जास्त पाणी साचलं होतं. चांदवड तालुक्यातल्या वडनेर गावातही मुसळधार पावसाने शेतीचं मोठं नुकसान झालं.