घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकला गडगडाटासह अवकाळी पाऊस; वीज पडून चौघांचा मृत्यू

नाशिकला गडगडाटासह अवकाळी पाऊस; वीज पडून चौघांचा मृत्यू

Subscribe

नाशिक शहरासह जिल्ह्यातील काही भागांत रविवारी, १४ एप्रिलला सायंकाळच्या सुमारास गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला. दिंडोरी व चांदवड तालुक्यात वीज पडून चौघांचा मृत्यू झाला.

नाशिक शहरासह जिल्ह्यातील काही भागांत रविवारी, १४ एप्रिलला सायंकाळच्या सुमारास गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला. अचानक आलेल्या या पावसामुळे वीकेण्डला बाजारपेठेत गेलेल्या नागरिकांची मात्र चांगलीच धावपळ झाली. द्राक्षांसह काही पीकांचेही या पावसाने नुकसान झाले. दरम्यान, दिंडोरी तालुक्यात वीज पडून चौघांचा मृत्यू झाला.

शहरात दुपारपासूनच पावसाचे वातावरण होते. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास सोसाट्याचा वारा सुरू झाला आणि सहा वाजता मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी गेलेल्या नागरिकांसह घराकडे परतणारे विद्यार्थी, चाकरमाने यांचेही चांगलेच हाल झाले. या पावसामुळे शहराच्या अनेक भागांतील वीजपुरवठा खंडीत झाला होता. दरम्यान, दिंडोरी तालुक्यातील शिवनई येथे वीज पडून बाळासाहेब भाऊराव गुंजाळ यांची गाय मृत्युमुखी पडली. तसेच, येवला तालुक्यातील देवठाण येथील शिवनाथ जाधव यांच्या शेतात वीज कोसळून एका गाईचा मृत्यू झाला.

- Advertisement -

चांदवड-दिंडोरीत चौघांचा मृत्यू

दिंडोरी तालुक्यातील मानोरी गावात वीज पडून तीन जणांचा मृत्यू झाला. अनिल गवे (वय ३२), सागर गवे (वय १७) आणि रोहित गायकवाड (१८) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. तसेच, चांदवड तालुक्यातील खडकओझर येथे विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसात वीज पडून जनाबाई सुभाष गिरी (४०) ही महिला ठार झाली. जिल्हा प्रशासनाकडून या सर्व घटनांचा पंचनामा व तातडीच्या मदतीसाठी कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, पुढील २४ तासांत हवामान खात्याने विजांच्या कडकडाटासह वादळ वारे व पावसाची शक्यता वर्तविली आहे.

पावसाच्या हजेरीने त्रेधातिरपिट… पाहण्यासाठी येथे करा क्लिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -