घरमहाराष्ट्रनाशिकदिंडोरी तालुक्यात सर्वाधिक मयत, दुबार मतदार

दिंडोरी तालुक्यात सर्वाधिक मयत, दुबार मतदार

Subscribe

जिल्हयातील ५५ हजार मतदारांची नावे वगळली

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्हयात सुरू असलेल्या मतदार यादी शुध्दिकरण आणि विशेष पुनरिक्षण मोहीमेतंर्गत दिंडोरी तालुक्यात सर्वाधिक ६ हजार मयत, दुबार नावे वगळण्यात आली आहे. जिल्हयात आतापर्यंत ५५ हजार मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत.

विधानसभा निवडणूकीचे पडघम वाजू लागले आहेत. सप्टेंबर महीन्यात निवडणूक आचारसंहीता लागू होण्याची शक्यता गृहीत धरून निवडणूक आयोगाने मतदार यादी शुध्दिकरण मोहीम हाती घेतली आहे. या मोहीमेत नाशिक जिल्हयाने आघाडी घेतली आहे. निवडणूकीत मयत, दुबार तसेच स्थलांतरीत मतदारांच्या नावाने बोगस मतदानाचे प्रकार घडतात. त्यानूसार मागील महीन्यापासून जिल्हा निवडणूक शाखेकडून मतदार याद्यांची शुध्दिकरण मोहीम हाती घेण्यात आली त्यानूसार जिल्हयातील ५५ हजार ९२७ नावे प्रशासनाने यादीतून वगळली आहे. ४६८ अर्जांची अद्याप प्रक्रिया सुरू आहे. ७६३ अर्ज हे पुर्नतपासणीसाठी पाठवले आहे. ४७ हजार २३७ अर्ज स्विकारण्यात आले आहे. ७ हजार ४६५ अर्ज हे नाकारण्यात आले आहे. ४५ हजार ९३० अर्जांची माहीती मतदार यादीत अद्यावत करण्यात आली आहे.

- Advertisement -

यादीतून वगळण्यात आलेली तालुकानिहाय नावे

नांदगाव ४७७८, मालेगाव मध्य ३७३१, मालेगाव बाहय ३४३४, बागलाण १९१७, कळवण ३२८२, चांदवड ४९४२, येवला ४९४२, सिन्नर ९६०७, निफाड २६२१, दिंडोरी ६१९६, नाशिक पूर्व १७४०, नाशिक मध्य ३१२१, नाशिक पश्चिम १०२९, देवळाली १३०८, इगतपुरी ३२७९

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -