घरमहाराष्ट्रनाशिकइतिहास! तब्बल ४८ वर्षांनंतर खासदार रिपीट

इतिहास! तब्बल ४८ वर्षांनंतर खासदार रिपीट

Subscribe

सलग दोन वेळा लोकसभेच्या निवडणुकीत विजयी होण्याची किमया हेमंत गोडसे यांनी केली आहे. यापूर्वी १९७१ मध्ये झालेल्या निवडणुकीत सलग दोन वेळा खासदारकीची माळ गळ्यात पडण्याचा भानुदास कवडे यांच्या विक्रमाशी तब्बल ४८ वर्षानंतर हेमंत गोडसे यांनी बरोबरी केली.

सलग दोन वेळा लोकसभेच्या निवडणुकीत विजयी होण्याची किमया हेमंत गोडसे यांनी केली आहे. यापूर्वी १९७१ मध्ये झालेल्या निवडणुकीत सलग दोन वेळा खासदारकीची माळ गळ्यात पडण्याचा भानुदास कवडे यांच्या विक्रमाशी तब्बल ४८ वर्षानंतर हेमंत गोडसे यांनी बरोबरी केली.

नाशिकमध्ये एकदा निवडून आलेला खासदारकीचा उमेदवार पुन्हा निवडून येत नाही, असे म्हटले जाते. यंदाच्या निवडणुकीतही याचीच चर्चा होती. इतिहासात डोकावून बघितले, तर १९६७ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर सलग दोन वेळा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे भानुदास कवडे खासदार झाले. त्यावेळी नव्याने स्थापन झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या तिकिटावर भाऊराव गायकवाड यांनी निवडणूक लढवली. कवडे यांनी त्यांचा ३६ हजार ३०७ मतांनी पराभव केला. कवडे यांना १ लाख ५५ हजार ६३२ मते म्हणजेच ५६.६० टक्के मते मिळाली. त्यानंतर १९७१ मध्ये झालेल्या निवडणुकीत कवडे यांनी भारतीय क्रांती दलाचे धैर्यशीलराव पवार यांचा तब्बल १ लाख ४५ हजार ७४१ मतांनी पराभव केला. कवडे यांना २ लाख ८ हजार ८९८ मते मिळाली. म्हणजेच ७४.१५ टक्के मते भानुदास कवडे यांना मिळाली. धैर्यशील पवार यांना अवघे ६३ हजार १५६ म्हणजे २२.४२ टक्के मते मिळालीत. सलग दोन वेळा खासदारकीची माळ गळ्यात पडण्याचा भानुदास कवडे यांचा विक्रम आजवर कोणीही मोडलेला नव्हता. यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे निवडून आल्याने त्यांनी कवडे यांच्या विक्रमाशी बरोबरी केली.

- Advertisement -

भुजबळांची संधी गमावली

सलग दोन वेळा निवडून येण्याचा मान कवडे यांना यापूर्वी मिळाला आहे. त्याचप्रमाणे एका निवडणुकीचे अंतर ठेवून दोनदा खासदारकी मिळवणारे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे गोविंदराव देशपांडे यांच्या स्मृती निवडणुकीनिमित्त जागृत झाल्या. पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत म्हणजे १९५१ मध्ये नाशिकचे पहिले खासदार म्हणून गोविंदराव देशपांडे यांना मान मिळाला. त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत समाजवादी पक्षाचे नारायणराव झोडगे यांचा ३५ हजार ६६१ मतांनी पराभव केला. त्यानंतर १९५७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत शेड्युुल कास्ट फेडरेशनचे भाऊराव गायकवाड यांनी गोविंदरावांचा ११ हजार ३६९ मतांनी पराभव केला. या पराभवाचा वचपा गोविंदरावांनी १९६२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत काढला. यावेळी त्यांनी भाऊराव गायकवाड यांचा तब्बल ५९ हजार ६५४ मतांनी पराभव केला होता. देशपांडे यांच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी समीर भुजबळांना होती. मात्र, मतदारांनी भुजबळांना ती संधी दिली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -