घरताज्या घडामोडीअशी आहे नाशिक शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची हिस्ट्री

अशी आहे नाशिक शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची हिस्ट्री

Subscribe

नाशिक शहरात आज दिवसभरात 57 नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आता शहरात एकूण 487 बाधित रुग्ण असून 168 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. 290 रुग्णांवर उपचार सुरू असून 22 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने शहरात 97 प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहेत.

नातलग करोनाबाधित
काठेमळा, टाकळी रोड येथील ५१ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्या कुटुंबातील २४ वर्षीय युवकाचा देखील अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. या दोघांवर  डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
भिवंडीतील डॉक्टर महिला बाधित
भिवंडी, ठाणे येथील २६ वर्षीय डॉक्टर महिला कोरोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यांनी नांदगाव ते नाशिक प्रवास केलेला आहे. त्यांच्यावर समाज कल्याण वसतीगृह येथील कोरोना कक्ष येथे उपचार सुरू आहेत.
नांदगाव रिटर्न युवक बाधित
जयदीपनगर येथील २१ वर्षीय युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.त्यानी नांदगाव नाशिक असा प्रवास केलेला आहे. त्याच्यावर समाज कल्याण वसतिगृह  येथील कोरोना कक्ष येथे उपचार सुरू आहेत.
नातलगामुळे मायलेकी बाधित
सरदार चौक, पंचवटी येथील  १५ वर्षीय मुलगी व ३८ वर्षीय महिला या मायलेकी कोरोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाला असून याच कुटुंबातील एक व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. त्यांच्यावर तपोवन कोरोना कक्ष येथे उपचार सुरू आहेत.
मृत व्यक्तीच्या संपर्कातील दोघे बाधित
नागचौक, पंचवटी येथील ६० वर्षीय पुरुष व ३६ वर्षीय महिला कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला असून हे दोघेही  मयत कोरोना बाधित वृद्ध महिलेच्या संपर्कातील आहेत. त्यांच्यावर तपोवन कोरोना कक्ष येथे उपचार सुरू आहे.
सातपुरला दोघे बाधित
सातपूर कॉलनी येथील एकाच कुटुंबातील ४० वर्षीय व्यक्ती व १३ वर्षीय  मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ते जुन्या रूग्णाच्या संपर्कातील आहेत. त्यांच्यावर डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
1 वर्षीय चिमुकला बाधित
टाकळीरोड,काठे मळा येथील १ वर्षीय बालक व २८ वर्षीय महिला दोघे कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला असून हे दोघे एकाच कुटुंबातील आहेत. या दोघांवर डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
जुन्या रुग्णांच्या संपर्कातील महिला पॉझिटिव्ह
आझाद चौक नाशिक येथील ५५ वर्षीय महिलेचा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला आहे. जुन्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत त्यांच्यावर डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत
पंचवटीत संपर्कातील दोघे बाधित
पंचवटीतील ५६ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला असून रुग्णाच्या संपर्कातील आहेत. त्यांच्यावर डॉ.झाकीर हुसेन रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. तर,  फुलेनगर, पेठरोड येथील १८ वर्षीय युवकाचा कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला असून त्याच्यावर डॉ.झाकीर हुसेन रुग्णालय येथे उपचार सुरू आहे.
जुने नाशिकमध्ये तिघे बाधित
नाईकवाडी पुरा येथील ३० वर्षीय व्यक्ती कोरोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाला असून त्याच्यावर डॉ.झाकीर हुसेन रुग्णालय येथे उपचार सुरू आहे. कादरी चौक, नाशिक येथील ४५ वर्षीय महिला कोरोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाला असून तिच्यावर डॉ.झाकीर हुसेन रुग्णालय येथे उपचार सुरू आहे. याच परिसरातील ४५ वर्षीय वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला असून त्यांच्यावर डॉ.झाकीर हुसेन रुग्णालय येथे उपचार सुरू आहे. अमरधाम रोड, कुंभारवाडा येथील २६ वर्षीय महिलेचा कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला असून त्यांच्यावर डॉ.झाकीर हुसेन रुग्णालय येथे उपचार सुरू आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -