घरताज्या घडामोडीघरातील बैठ्या खेळांना ‘अच्छे दिन’  

घरातील बैठ्या खेळांना ‘अच्छे दिन’  

Subscribe

घरोघरी रंगतोय कॅरम, बुध्दिबळ, पत्ते, चल्लसआठ, सापशिडीचा डाव

नाशिक : मोबाईल, टिव्ही आणि कंप्युटरच्या जमान्यात नामशेष होण्यावर असलेल्या घरगुती खेळांना लॉकडाऊनच्या काळात अच्छे दिन आले आहेत. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजन घरातच अडकल्याने हे सर्व आता कॅरम, बुध्दिबळ, पत्ते, सापशिडीच्या डावात रंगलेले बघायला मिळतात. दरवर्षी शाळांना 15 एप्रिलनंतर उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होतात. यंदा ’करोना’च्या प्रादुभार्वाने विद्यार्थ्यांना अनपेक्षितरित्या जास्तीच्या सुट्या मिळत आहेत. त्यात बाहेरील ’लॉकडाउन’ परिस्थितीत घराबाहेरही पडणे शक्य नाही. त्यामुळे सुट्टीमध्ये गावाला जाणे, मैदानावर खेळाला जाणे, फिरण्यासाठी जाणे, उन्हाळी शिबिर जॉइन करणे अशक्य झाले आहे. यामुळे घरात कोंडले असताना पालक व शेजारच्या मोजक्या मित्र-मैत्रिणींसोबत कॅरमपासून ते बुध्दिबळ, पत्ते, सागरगोटे, चल्लसआठ, सापशिडी, नवा व्यापार अशा विविध खेळांचे डाव घरांमध्ये रंगू लागले आहेत. पारंपरिक अशा विविध खेळांची ओळखही घरातील आजी-आजोबा, आई-वडील यांच्याकडून मुलांना करून दिली जाऊ लागली आहे. मुलांनाही या खेळांमध्ये नावीन्य वाटत असल्यामुळे तीदेखील त्यामध्ये मग्न होऊ लागली आहेत. पारंपरिक खेळांसोबतच गप्पा-गोष्टी, गाण्याच्या भेंड्या, गणिती कोडी अशा लुप्त होत चाललेल्या बैठया खेळांच्या संकल्पनांना पुन्हा चांगले दिवस आले आहेत. आपल्या पालकांसोबत मुलांना मनसोक्त खेळता व संवाद साधता येत असल्याने अनेक घरातील वातावरण मुलांच्या उपस्थितीने चांगलेच गजबजलेले दिसते. खेळांसोबतच नवनवीन खाद्यपदार्थांचाही आस्वाद घेतला जात आहे.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -