घरताज्या घडामोडीनाशिकमधून १७०० स्थलांतरित मजूरांची घरवापसी

नाशिकमधून १७०० स्थलांतरित मजूरांची घरवापसी

Subscribe

एस.टी.महामंडळाकडून बसेसचे नियोजन

लॉकडाऊन दरम्यान हाताशी काम नसल्यामुळे अनेक परप्रांतिय मजूर आपापल्या मुळगावाकडे परत निघाले आहेत. गेल्या ४५ दिवसांपासून अडकून पडलेल्या मजूरांचा संयम सुटला असून मिळेल त्या मार्गाने आता हे मजूर आपापल्या गावी परतू लागले आहेत. नाशिकमार्गे परतणार्‍या सुमारे १७३८ स्थलांतरित मजूरांसाठी राज्य परिवहन मंडळाच्या नाशिक आगराच्यावतीने बसेस उपलब्ध करून दिल्या असून दोन दिवसांत ७९ बसेस सोडण्यात आल्याची माहीती उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे यांनी दिली.

भारतात करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. लॉकडाऊन दरम्यान स्थलांतरित मजूरांना आपापल्या गावात सोडण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. स्थलांतरित मजुरांसाठी रेल्वे, ट्रेन, बसेसची सुविधा सरकारकडून केले जात आहे. राज्य सरकार मजुरांना घरी पाठवण्यासाठी नियोजन करत आहे. नाशिक येथून परप्रांतियांसाठी विशेष ट्रेनदेखील सोडण्यात आल्या आहेत. मात्र, करोनाच्या भीतीमुळे आणखी किती दिवस लॉकडाउन राहणार याबाबत निश्चितपणे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे आता संयम सुटलेल्या स्थालांतरित पायी आपल्या गावाकडे निघाले आहेत. रविवारी कसारा घाटात पायी जाणार्‍या मजूरांची गर्दी दिसून आली. कसारा घाटात पायी चालणार्‍या मजुरांमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, गुजरात मध्य प्रदेश अशा विविध राज्यांचे नागरिक आहेत. हे मजूर आपल्या संपूर्ण परिवाराला घेऊन गावाकडे निघाले आहेत. काही मजूर रिक्षा, टॅम्पो, दुचाकी किंवा मिळेल त्या गाडीने प्रवास करत आहेत. तर कित्येक मजूर पायी आपल्या गावाकडे निघाले आहेत. दरम्यान, या नागरिकांना आपापल्या राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने बसेसची व्यवस्था करून दिली आहे. नाशिक जिल्हयातून जाणार्‍या स्थलांतरीतांच्या प्रवासाचे नियोजन करण्यासाठी उपजिल्हाधिकारी निलेश श्रींगी आणि नितीन मुंडावरे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पायी जाणार्‍या मजूरांची संख्या बघता जिल्हयातील विविध आगारातून बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत नाशिकपासून ते मध्यप्रदेशच्या सीमेपर्यंत सुमारे ७९ बसेस सोडण्यात आल्या. रस्त्याने पायी जाणार्‍या भाविकांना या बसेसच्या माध्यमातून त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहविण्यात येणार आहे. आतापर्यंत सुमारे १७०० स्थलांतरीत नागरीकांना बसेस उपलब्ध करून दिल्याचे उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे यांनी सांगितले.

- Advertisement -

रिक्षाने प्रवास
करोनाच्या भीतीमुळे शेकडो मजुरांनी मुळगावी जाण्याचा रस्ता धरला आहे. मजूर मिळेल त्या गाडीने जात आहेत. काही ट्रक, टेम्पोने आपापल्या गावी जात आहेत. तर काही नागरिक आपल्या लहान मुलांसह भर उन्हात रिक्षाने प्रवास करत आहेत. एका रिक्षात तब्बल १२ प्रवासी प्रवास करत आहेत. या शेकडो मजुरांमध्ये एकाही व्यक्तीला करोनाची लागण झाली असल्यास मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

पायी जाणार्‍या नागरिकांच्या प्रवासासाठी बसेसची सोय करण्यात आली असून एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक, त्यांचे सहकारी, सर्व तहसिलदार, पोलीस अधिकारी, राजकिय पदाधिकारी, स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून या नागरिकांना सुनियाजीत पध्दतीने बसमधून मध्यप्रदेशच्या सीमेवर सोडण्यात आले. तसेच जिल्हयात परजिल्हयातील तसेच परराज्यातील अडकलेल्या नागरिकांचीही व्यवस्था करण्यात येत आहे.
नितीन मुंडावरे,
उपजिल्हाधिकारी, नाशिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -