घरमहाराष्ट्रनाशिकतीन दिवस रात्री १० नंतर हॉटेल्स राहणार बंद

तीन दिवस रात्री १० नंतर हॉटेल्स राहणार बंद

Subscribe

पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती

निवडणूक निरीक्षक, नाशिक यांना गुरुवारी (ता.२५) व शुक्रवारी (ता.२६) मागील वर्षाच्या तुलनेत देशी दारूची १३० टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात विक्री झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्या अनुषंगाने शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी, मतदानप्रक्रिया निर्भय व शांततामय वातावरणात पार पडावी, यासाठी नाशिक आयुक्तालय कार्यक्षेत्रातील हॉटेल, रेस्टॉरंट, परमीट रूम, बार व देशी-विदेशी दारू विक्री करणारे दुकाने शनिवार (ता.२७), रविवार (ता.२८) व सोमवारी (ता.२९) रात्री १० वाजेनंतर बंद ठेवण्याबाबत आदेश काढला आहे, अशी माहिती शहर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नांगरे-पाटील म्हणाले, केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ११ मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात सोमवारी (ता.२९) रोजी मतदानप्रक्रिया होणार आहे. २३ मे २०१९ रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीसाठी नाशिक पोलीस सज्ज झाले आहेत. निवडणूकप्रक्रिया निर्भय व शांततामय वातावरणात पार पाडताना आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीमध्ये अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी नाशिक आयुक्तालय कार्यक्षेत्रातील हॉटेल, रेस्टॉरंट, परमिट रूम, बार व देशी-विदेशी दारू दुकाने शनिवार ते सोमवारपर्यंत रात्री १० वाजेनंतर बंद राहणार आहेत.

- Advertisement -

उल्लंघन करणार्‍यांवर फौजदारी कारवाई

लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी (ता.२९) मतदान होणार आहे. त्यामुळे शहरातील देशी-विदेशी दारू विक्री करणारे दुकाने शनिवार ते सोमवारी रात्री १० वाजेनंतर बंद ठेवण्याबाबत आदेश काढला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणार्‍या व्यक्तीवर फौजदारी कारवाई केली जाणार आहे.
विश्वास नांगरे-पाटील, पोलीस आयुक्त, नाशिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -