घरमहाराष्ट्रनाशिकहग डे : मानसिक आधार देणारी जादु की झप्पी

हग डे : मानसिक आधार देणारी जादु की झप्पी

Subscribe

मिठी मारल्याने लव्ह हार्मोन्स मध्ये वाढ

नाशिक :  आयुष्यात ताणतणाव असताना आपल्या आवडत्या व्यक्तीने आपल्याला मिठी मारली तर सर्व तणाव क्षणात दूर होतो. अर्थात, जे शब्दांतून व्यक्त करता येत नाही, ते एका मिठीतून व्यक्त होत असतं. आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रेमाने मिठी मारणे ही भावना फार विलक्षण असते. अशा या जादु की झप्पीमुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यही चांगले राहण्यास मदत होते. म्हणूनच रविवारी (दि.१२) साजर्‍या होत असलेल्या हग डेला अधिक महत्त्व आहे.

 व्हॅलेंटाइन वीकमधला सहावा दिवस हग डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी आपण फक्त पार्टनरच नव्हे तर आई-वडिलांनादेखील आपण मिठी मारू शकतो. मित्र, मैत्रीण, बहीण, भाऊ अशा कोणालाही आपण मिठी मारू शकतो. या एका मिठीतून प्रेम वाढते. शास्त्रीय दृष्टिकोनातून मिठी मारल्याने शरीरात लव्ह हार्मोन्स (ऑक्सिटोसिनचे) प्रमाण वाढते. हे हार्मोन्स हृदयासाठी फायदेशीर असतात

- Advertisement -

 हग डेला आपल्या पार्टनरला त्याच्या आवडीच्या ठिकाणी घेऊन जा. व्हॅलेंटाइन विक धूमधडाक्यात सुरू आहे. रोझ डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे नंतर आता आज १२ फेब्रुवारीला हग डे साजरा केला जाणार आहे . हग डेला आपल्या आवडत्या व्यक्तीला मिठी मारलीच पाहिजे, असे काही नाही. मात्र, जोडीदारात सुरक्षिततेची जाणीव निर्माण होणे, हे अधिक महत्त्वाचे असते. ही जाणीव आपण मिठीतून करुन देत असतो. दरम्यान, प्रेमाचा सप्ताह सर्वत्र जोरदार साजरा केला जात असताना आता तरुणाईला खर्‍या अर्थाने व्हॅलेंटाईन्स डेचे वेध लागलेले दिसून येत आहेत. प्रत्यक्ष शक्य नसल्यास अप्रत्यक्षरित्या आपल्या व्हॅलेंटाईन्सला सोशल मीडियावरूनही संदेशांद्वारे या हग डेच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत.

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -