घरCORONA UPDATEमालेगावमध्ये मोठा जमाव रस्त्यावर, पोलिसांवरच धावून जाण्याचा धक्कादायक प्रकार!

मालेगावमध्ये मोठा जमाव रस्त्यावर, पोलिसांवरच धावून जाण्याचा धक्कादायक प्रकार!

Subscribe

मालेगावमध्ये एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना कोरोनाचा संसर्ग रोखण्याचं एक मोठं आव्हान येथील प्रशासनासमोर आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग हे खूप महत्त्वाचे आहे. मात्र मालेगावमध्ये नागरिकांकडून या नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. मालेगावमध्ये एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा १००च्या वर गेलेला असतान स्थानिक प्रशासनाची लोकांना घरातच ठेवण्यासाठी दमछाक होत आहे. त्यात गुरुवारी सकाळी रस्त्यावर मोठ्या संख्येने उतरलेला जमाव थेट पोलिसांवरच धावून गेल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारामुळे सदर परिसरामध्ये तणावाचं वातावरण आहे.

नक्की घडलं काय?

लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन वारंवार होत असल्यामुळे मालेगावमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देखील वाढविण्यात आलेला असताना गुरुवारी सकाळी संचारबंदीचे उल्लंघन करत काही नागरिक रस्त्यावर वावरत असताना पोलिसांनी त्यांना हटकले. बंद करण्यात आलेला रस्ता खुला करून त्या भागातून जाऊ द्यावं यासाठी हा जमाव गोळा झाला होता. यावेळी एकास दंडुक्याचा प्रसाद देखील दिल्याचे सूत्रांकडून समजते. याचाच राग येऊन शेकडो नागरिक पोलिसांविरोधात आंदोलन करत रस्त्यावर उतरले. या नागरिकांनी पोलिसांच्या अंगावर धावून जाण्याचा देखील प्रयत्न केला. खयाबाण निषाद पूल या ठिकाणी ही घटना घडल्याचे समजते. मात्र, यावेळी तातडीने अतिरिक्त पोलिस फौजफाटा दाखल झाले असता यानंतर ही परिस्थिती नियंत्रणात आली. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण मात्र कायम आहे.

- Advertisement -

मालेगावमध्ये जमावाची पोलिसांवर दगडफेक

मालेगावमध्ये जमावाची पोलिसांवर दगडफेक

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಏಪ್ರಿಲ್ 22, 2020

बुधवारपर्यंत मालेगावमध्ये ९६ कोरोनाचे रुग्ण होते. मात्र, गुरुवारी त्यात नवीन ५ रुग्णांची भर पडली. त्यामुळे मालेगावची रुग्णसंख्या १०१ झाली आहे. त्यामुळे १०० रुग्णांचा आकडा पार करणारा मालेगाव हा नाशिकमधला पहिला तालुका ठरला आहे. त्याशिवाय मालेगावमध्ये नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आढळलेले एकूण १४ रुग्ण आहेत. त्यामुळे आता एकूण संख्या ११५वर गेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -