घरमहाराष्ट्रनाशिकVideo : एक 'वाघ' गेल्याने फरक पडत नाही; पवार साहेबांकडे शेकडो वाघिणी...

Video : एक ‘वाघ’ गेल्याने फरक पडत नाही; पवार साहेबांकडे शेकडो वाघिणी आहेत : प्रेरणा बलकवडे

Subscribe

राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या भाजप प्रवेशानंतर नाशिक जिल्हा राष्ट्रवादी महिला आघाडी अध्यक्षांनी चंद्रकांत पाटलांच्या वाक्याचा घेतला समाचार

“एक वाघ भाजपमध्ये गेल्याने भाजपला आनंद वाटत असेल मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसला फरक पडलेला नाही. शरद पवार साहेबांबरोबर विरोधकांचा समाचार घेण्यासाठी हजारो वाघिणी तत्पर आहेत.’ असे जिल्हा अध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तीन आमदारांसह महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या प्रवेश सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला.

प्रेरणा बलकवडेंचा चित्रा वाघ यांच्यावर हल्ला

प्रेरणा बलकवडेंचा चित्रा वाघ यांच्यावर हल्ला

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಗುರುವಾರ, ಆಗಸ್ಟ್ 1, 2019

- Advertisement -

 

जिल्हाध्यक्षा बलकवडे सध्या जिल्हा परिषद गटनिहाय महिलांच्या बैठका घेत आहेत. आज मुंबईत झालेल्या भाजप प्रवेश सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी ‘आज सबंध व्यासपीठ राष्ट्रवादीमय झाले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व महिलांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्या पक्षात कोणीही महिला राहिलेल्या नाहीत.’ या केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. त्या म्हणाल्या, “मला त्यांना सांगायचे आहे की ज्या भाजमध्ये आल्या त्यांच्यासमवेत एक टक्का महिलाही गेलेल्या नाहीत. शरद पवारांनी अनेक महिला नेत्या, कार्यकर्त्या घडविल्या आहेत. त्यामुळे एक वाघ गेल्याने आम्हाला काहीच फरक पडत नाही. आमच्या शेकडो वाघिणी विरोधकांवर झडप घालण्यासाठी तयार आहेत तसेच तुम्ही तुमच्याच व्यासपीठाचा अभ्यास करावा. तुमचे संपुर्ण व्यासपीठ आज राष्ट्रवादीमय झाले आहे. तुम्ही एव्हढेच राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या प्रेमात पडला असाल तर त्यांना आयात करण्यापेक्षा तुम्हीच का नाही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात विलीन होत. महाराष्ट्रात भाजपलाच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव देण्याची गरज निर्माण झाली आहे.” असेही त्या म्हणाल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -