घर उत्तर महाराष्ट्र शेकडो किलो बनावट पनीर अन् मिठाई जप्त, 'एफडीए'चा छापा

शेकडो किलो बनावट पनीर अन् मिठाई जप्त, ‘एफडीए’चा छापा

Subscribe

नाशिक : अन्न व औषध प्रशासन नाशिकच्या पथकाने देवळाली कॅम्पमधील जसपालसिंग कोहली व प्रशांत यादव यांच्या दोन स्वीट उत्पादकांच्या दुकानांवर मंगळवारी छापे टाकले. या छाप्यात दुकानामध्ये विनापरवाना पनीर उत्पादन करून साठा केला जात असल्याचे समोर आले आहे. मानवी आरोग्यास धोकादायक असल्याने पथकाने पनीर, अंजीर बर्फी, पेढ्यासह मिठाईचा साठा नष्ट करण्यात आला. पथकाने तीन अन्न नमुने विश्लेषनासाठी घेतले असून, विश्लेषण अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई केली जाणार आहे.

शहरात बनावट पनीर व भेसळयुक्त पनीरची विक्री होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनास मिळाली. त्यानुसार पथकाने मंगळवारी (दि. २९) जसपालसिंग प्रीतीपालसिंग कोहली, आनंद रोड, बलवंत प्लाझाजवळ, देवळाली कॅम्प, नाशिक या पेढीची तपासणी केली या पेढीत पथकास अस्वच्छ वातावरणात पनीरचा साठा साठवल्याचे निदर्शनास आले. शिवाय, पेढी विनापरवाना पनीर उत्पादन करीत असल्याचे आढळून आले. पनीरच्या भेसळीच्या संशयावरून अन्न नमुना विश्लेषणासाठी घेऊन उर्वरीत १७१.५ किलो ग्रॅम किंमत रुपये ३७ हजार ७३० रुपयांचा साठा जप्त केला होता. साठा मंगळवारी नाशवंत असल्याने जनआरोग्याच्या हिताच्या दृष्टीने जागेवर नष्ट करण्यात आला.

- Advertisement -

दुसर्‍या घटनेत, पथकाने मंगळवारी (दि.२९) मे प्रशांत कोंडीराम यादव आनंद रोड, बलवंत प्लाझाजवळ, देवळाली कॅम्प, नाशिक या स्वीट उत्पादक, पेढीवर पेढीची तपासणी केली असता विनापरवाना पेढीत अस्वच्छ वातावरणात पेढा, अंजीर बर्फी इत्यादी मिठाईचा साठा साठवल्याचे निदर्शनास आले. भेसळीच्या संशयावरून तसेच अनआरोग्य ठिकाणी उत्पादन केल्याने अन्न नमुने विश्लेषनासाठी घेउन उर्वरीत ५३ किलो ग्रॅ. किंमत रुपये २१ हजार ७२० रुपयांचा साठा जप्त केला. हा साठा २९ ऑगस्ट रोजी नाशवंत असल्याने जनआरोग्याच्या हिताच्या दृष्टीने जागेवर नष्ट करण्यात आला.या मोहिमेत तीन अन्न नमुने विश्लेषनासाठी घेण्यात आलेला असून, विश्लेषण अहवाल प्राप्त होताच अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अन्वये पुढील कारवाई घेण्यात येईल. ही कारवाई अन्न सुरक्षा यो. रो. देशमुख व उमेश सुर्यवंशी, सहाय्यक आयुक्त उ. सि. लोहकरे यांनी व संजय नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

प्रशासनाचे आवाहन

अन्न व्यवसाईकांनी अन्न पदार्थात भेसळ करु नये. भेसळ करताना आढळून आल्यास संबंधितावर कडक कारवाई केली जाईल. अन्न व औषध दर्जा संबंधी संशय असल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -