घरताज्या घडामोडी‘आयसीएमआर’तर्फे नाशिकच्या करोना टेस्टींग लॅबला मान्यता

‘आयसीएमआर’तर्फे नाशिकच्या करोना टेस्टींग लॅबला मान्यता

Subscribe

’मविप्र’च्या डॉ.वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात लवकरच तपासणी

नाशिक : नाशिककरांना प्रतिक्षा लागून असलेल्या करोना टेस्टींग लॅबला इंडियन कौन्सिल ऑफ मेडीकल रिसर्चने (आयसीएमआर) मान्यता दिली आहे. आयसीएमआरच्या महासंचालकांनी सोमवारी (दि.20) मविप्र समाज शिक्षण संस्थेच्या डॉ.वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील यांना हे पत्र दिले आहे. आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात करोना टेस्टिंग लॅब येत्या आठवड्यात सुरु होणार आहे. गेल्या आठवड्यातच येथे लॅब सुरु करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्यासह लोकप्रतिनिधींनी या लॅबसाठी मोठ्या प्रमाणात मदत व परवानगी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. ‘आयसीएमआर’च्या महासंचालक तथा ‘एआयआयएमएस’मधील मायक्रोबायोलॉजीच्या प्राध्यापिका डॉ.मीना मिस्त्रा यांनी या लॅबची तपासणी केली. यात येथील कर्मचारी, आवश्यक सामुग्री आदी अत्यावश्यक बाबींची पाहणी केली. अखेर सोमवारी (दि.20) ’आयसीएमआर’ने ही लॅब सुरु करण्यास परवानगी दिली आहे. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार व उपजिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या लॅबची पाहणी केली होती.
&प्रतिकिया
सात दिवसांपूर्वी या लॅबची स्थापना केली. तसेच दातार जेनेटिकमधील अत्याधुनिक उपकरणे स्थापित केल्यामुळे त्याचा तपासणी दर आणि निष्कर्ष सुद्धा दर्जेदार असतील. करोना विरोधी लढाईमध्ये एक महत्त्वाचा टप्पा आहे.
-सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -