घरमहाराष्ट्रनाशिकवाहतुकीचे नियम तोडल्यास आता बसणार जास्त भुर्दंड

वाहतुकीचे नियम तोडल्यास आता बसणार जास्त भुर्दंड

Subscribe

ट्रॅफिकचे नवीन नियम लागू

केंद्र सरकारने 1 सप्टेंबरपासून नवीन वाहतूक नियम लागू केले आहेत. मोटार वाहन कायद्यातील नियमांचे उल्लंघन केल्यास होणार्‍या दंडात्मक कारवाईत बदल करण्यात आला असून, अल्पवयीन वाहनचालकास २५ हजार, मद्यपी वाहनचालकास १० हजार, विनापरवाना चालकास तब्बल ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे.

वाहतुकीचे नियम बदलून नवे नियम लागू करण्यासाठीच्या विधेयकाला संसदेने मंजुरी दिली. त्यानुसार आता वाहतूक नियम तोडल्यास नव्या दरांनुसार दंड आकारला जाणार आहे. वाहन चालवण्याच्या परवान्यासाठीही अधिक कडक निकष लावण्यात येणार आहेत. नव्या नियमांनुसार, आपत्कालीन वाहनांना रस्ता दिला नाही किंवा अपात्र असताना गाडी चालवली तर 10 हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे. सीट बेल्ट लावलेला नसल्यास एक हजार, भरधाव वेगाने गाडी चालवली तर 2 हजार रुपये दंड होणार आहे.

- Advertisement -

.. तर पालकांना ३ वर्षे शिक्षा

अल्पवयीन मुलामुलीने वाहन चालवल्यास अथवा त्याचा अपघात घडल्यास 25 हजार रुपये दंड आणि त्याच्या पालकांना ३ वर्षे शिक्षा होणार आहे. त्याचबरोबर आरटीओकडून वाहननोंदणी रद्द केली जाणार असून अल्पवयीनास २५ वयापर्यंत परवाना न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

असे आहेत नवे वाहतूक नियम

  • विनासीट बेल्ट – रु. 300 ते रु. 1000
  • दुचाकी दोनपेक्षा अधिक प्रवासी – रु. 100 ते  रु. 1000
  • विनाहेल्मेट रु. 200 ते रु. 1000, ३ महिने लायसन्स निलंबित
  • रुग्णवाहिकेस रस्ता न दिल्यास रु. 10,000
  • विनापरवाना वाहन चालविणे रु. 500 ते रु. 5000
  • अपात्र परवानाधारक रु. 500 ते रु. 10,000
  • भरधाव वेगाने वाहन चालवणे रु. 400 ते रु. 2000
  • धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे रु. 1000 ते रु. 5000
  • मद्य पिऊन वाहन चालवणे रु. 2000 ते रु. 10000
  • वाहन चालवताना मोबाईवर बोलणे रु. 1000 ते रु. 5000
  • विनापरवाना वाहन चालवणे रु. 5000 ते रु. 10000
  • अधिक क्षमतेने वाहन चालवणे रु. 2000 ते रु. 2000 व प्रति टन २ हजार
  • अल्पवयीन मुलामुलीने वाहन चालवणे – रु. 25000
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -