घरमहाराष्ट्रनाशिकनाशिककरांनो, मास्क वापरा अन्यथा थेट कोरोना चाचणी केंद्रात रवानगी

नाशिककरांनो, मास्क वापरा अन्यथा थेट कोरोना चाचणी केंद्रात रवानगी

Subscribe

कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दणका

नाशिकमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा झपाट्याने वाढत आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. परंतु या नियमांचे नागरिकांकडून पालन होताना दिसत नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आणखी कडक निर्बंध लागू केले आहेत. नाशिकमध्ये मास्क न घालणाऱ्यांना थेट कोरोना चाचणी केंद्रात रवाना करण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भावा वाढत आहे परंतु नागरिक मास्क वापर करत नाही आहेत. अशा नागरिकांची थेट कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. मागील आठवड्यात हजारो लोकांवर गुन्हा नोंदवला असून काहींची चाचणी केली असता कोरोना सकारात्मक अहवाल प्राप्त झाले असल्याचे नाशिक जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले आहे.

नाशिकमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली असल्याने पुन्हा हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आला आहे. परंतु काही नागरिक मास्क न घालता बेजबाबदारपणे फिरत आहेत. त्यामुळे अशा नागरिकांना शिक्षा म्हणून दंड आणि कोरोना चाचणी केंद्रात रवाना करण्यात येणार आहे. कोरोना नियमांची पायमल्ली करणाऱ्यांना दणका देत नाशिक मनपाने दिवसभरात ८० हजार पेक्षा अधिक दंड वसूल केला आहे.

- Advertisement -

नाशिकचे पालकमंत्री व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आज नाशिकमधील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैठक घेणार आहेत. या बैठकीत नाशिकमध्ये लॉकडाऊन करण्यात येणार की आणखी कडक निर्बंध लावण्यात येणार यावर चर्चा करण्यात येणार आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -