घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रExclusive : एका बेडवर दोन रुग्ण तर, नवे बेड धूळ खात; सिव्हिलचा...

Exclusive : एका बेडवर दोन रुग्ण तर, नवे बेड धूळ खात; सिव्हिलचा भोंगळ कारभार

Subscribe

नाशिक : गोरगरीबांचे रुग्णालय अशी ओळख असलेल्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. रुग्णालयात एका बाजूला खाटांअभावी दोन रुग्णांना एकाच खाटांवर झोपावे लागत आहे तर दुसर्‍या बाजूला जुने वैद्यकीय साहित्य व खाटा रुग्णालयात धूळखात पडून असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. शासकीय निधीतून रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी शासन दरबारी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णसेवेला हरताळ फासला जात असल्याचे दिसून येत आहे.

नाशिक जिल्ह्याचे क्षेत्रफळ मोठे आहे. शिवाय, नाशिकमध्ये देशभरामधून देवदर्शनासह पर्यटना नागरिक मोठ्या संख्येने येतात. जिल्ह्यात कोठेही जीवघेणा अपघात झाल्यास तात्काळ रुग्णांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले जाते. शिवाय, अतिदुर्गम भागातील गंभीर आजाराच्या रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार केले जातात. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात दररोज हजारो रुग्ण येत असतात. रुग्णांना चांगली सेवा व औषधेउपचार मिळावेत, यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून करोडो रुपयांचा निधी येतो. या निधीतून रुग्णांना वैद्यकीय सेवा दिली जात आहे. मात्र, जिल्हा रुग्णालयात प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जिल्हा रुग्णालयातील कुंभमेळा इमारतीमध्ये जुने व नवीन वैद्यकीय साहित्य ठेवण्यात आले आहे. तर रुग्णालयाच्या मुख्य इमारतीत उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांसह नातेवाईकांना खाटा उपलब्ध नसणे, उपचारासाठी वेळेत डॉक्टर उपलब्ध नसल्याच्या तक्रारी त्यांच्याकडून केल्या जात आहेत.

- Advertisement -

जिल्हा रुग्णालयास सलग तीन वर्ष देशपातळीवरील कायाकल्प पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे रुग्णालयाचा नावलौकिक वाढला आहे. मात्र, रुग्णालय प्रशासनात ताळमेळ नसल्याचे दिसून येत आहे. बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र राज्यभर गाजल्याने रुग्णालयाच्या प्रतिमा खालावली आहे. त्यातून तरी प्रशासन सुधारेल आणि रुग्णांसह नातेवाईकांना चांगली सेवा मिळेल, अशी अपेक्षा रुग्ण करत आहेत. मात्र, आजही त्यांच्या पदरी निराशा असल्याचे दिसून येत आहे. नुतनीकरणाच्या नावाखाली रुग्णांच्या वेदना कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे दिसून येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -