घरताज्या घडामोडीपोलिसात तक्रार दिली तर तुझा गेम करुन टाकीन

पोलिसात तक्रार दिली तर तुझा गेम करुन टाकीन

Subscribe

चौघांची एकाला धमकी; कारसाठी अपहरण

तु जर आम्हाला गाडी वापरण्यास दिली नाही, आमचे कॉल उचलले नाही व पोलिसात तक्रार दिली तर तुझा गेम करुन टाकीन, अशी धमकी चौघांनी एकाला देत मारहाण केली. ही घटना हॉटेल वॉटर मेलन, पाथर्डी शिवार, इंदिरानगर येथे घडली. याप्रकरणी नितीन मोहन वाडेकर यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी अर्जुन पिवाल (रा.मॉडल कॉलनी, जेलरोड), मनोज गांगुर्डे, सनी पगारे, गणेश ऊर्फ झंगड्या भाई (रा.पंचवटी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, चौघांनी संगनमत करत नितीन वाडेकर यांना त्यांची कार फिरण्यासाठी मागितली. त्यास त्यांनी नकार दिला असता चौघांनी त्यांना मारहाण केली. त्यांच्या कारमध्ये चौघजण बळजबरीने बसले. त्यांना सिन्नर एमआयडीसी येथे घेवून आले. या ठिकाणी पुन्हा त्यांना चौघांनी मारहाण केली. तु जर आम्हाला गाडी वापरण्यास दिली नाही, आमचे कॉल उचलले नाही व पोलिसात तक्रार दिली तर तुझा गेम करुन टाकीन, अशी धमकी दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक भामरे करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -