घरताज्या घडामोडीतु मला लग्नासाठी होकार दे नाहीतर मारुन टाकेन

तु मला लग्नासाठी होकार दे नाहीतर मारुन टाकेन

Subscribe

तरुणीचा पाठलाग करत धमकी देणार्‍यावर गुन्हा

तु मला लग्नासाठी होकार दे नाहीतर मी तुला मारुन टाकेन, अशी एकाने तरुणीचा पाठलाग करुन धमकी दिल्याची घटना बुधवारी (दि.१८) रात्री ८ वाजेदरम्यान आनंदवली बसस्टॉप ते आनंदवली टेलिफोन ऑफिसमागे, गंगापूर रोड येथे घडली. याप्रकरणी पीडित तरुणीने गंगापूर पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी मनोज रामकिसन गायकवाड (१८, रा.जाधवमळा, गंगापूर रोड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मनोज याने तरुणीचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. त्याने आनंदवली बसस्टॉपच्या पुढे तरुणीची भेट घेतली. मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे त्याने तिला सांगितले. त्यास तिने नकार दिला असता त्याने तिच्या आई व भावास शिवीगाळ केली. मी तुम्हाला मारुन टाकेन, अशी धमकी त्याने दिली. तु मला लग्नासाठी होकार दे नाहीतर मी तुला मारुन टाकेन, अशी धमकी त्याने दिली. त्याच्या तावडीतून कशीबशी सुटका करुन घेत तरुणीने गंगापूर पोलीस ठाणे गाठत आपबिती सांगितली. पुढील तपास पोलीस हवालदार पाटील करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -