घरमहाराष्ट्रनाशिकउत्पादन शुल्कच्या कारवाईत १३ लाखांचा मुद्देमाल जप्त

उत्पादन शुल्कच्या कारवाईत १३ लाखांचा मुद्देमाल जप्त

Subscribe

राज्य उत्पादन शुल्क, नाशिक विभागाच्या भरारी पथकाने गुरुवारी, ९ मे रोजी सुरगाणा तालुक्यातील मनखेड शिवारात केलेल्या कारवाईत अवैध मद्यसाठ्यासह १३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

राज्य उत्पादन शुल्क, नाशिक विभागाच्या भरारी पथकाने गुरुवारी, ९ मे रोजी सुरगाणा तालुक्यातील मनखेड शिवारात केलेल्या कारवाईत अवैध मद्यसाठ्यासह १३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत दोन वाहनांमधील दोघांना अटक करण्यात आली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे, अधीक्षक चरणसिंग राजपूत, उपअधीक्षक बी. एन. भूतकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने ही कारवाई केली. त्यात जाहुले-मनखेड रोडलगत मनखेड शिवारात अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या स्कॉर्पिओ (एमएच-०१, बी.वाय.-६७४१) या वाहनासह स्विफ्ट (जीजे-२१, बीसी-२३१९) कार पथकाने जप्त केली. या दोन्ही वाहनांमधील संशयीत आरोपी महेश शांताराम भोये व गणेश परसू माहला यांनाही पथकाने अटक केली. या वाहनांमध्ये देशी दारूचा साठा आढळून आला. या कारवाईत निरीक्षक एन. एम. खांदवे, दुय्यम निरीक्षक सुरेश शिंदे, सुरेंद्र बनसोडे, जवान लोकेश गायकवाड, संजय सोनवणे, महेश सातपूते, वाहन चालक महेश खामकर, पांडुरंग वाईकर व सुनिता महाजन सहभागी झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -