इगतपुरीत अवैध मार्गाने लोखंडी सळ्यांची चोरी

हा धंदा उत्तर भारतीय गुन्हेगारांकडून चालविला जातो

Illegal theft of iron rods in Igatpuri

मुंबई-आग्रा महामार्गावरील नाशिकच्या दिशेने जाणार्‍या विल्होळीच्यापुढे आठव्या मैल परिसरात अवैध धंद्याचा सुळसुळाट सुरु झाला आहे. याठिकाणी मुंबईला लोखंडी सळ्या घेऊन जाणार्‍या ट्रेलरमधून चोरीच्या मार्गाने लोखंडाच्या सळ्या उतरवण्याचे काम बिनधास्तपणे सुरू आहे. महामार्गावरील एका ढाब्याच्या परिसरात हा धंदा उत्तर भारतीय गुन्हेगारांकडून चालविला जात असून रात्रीच्या वेळी या ठिकाणी मुंबईकडे लोखंडी सळ्या घेऊन जाणारे असंख्य ट्रेलर येथे थांबत असल्याने वाहतूक कोंडी होते. येथे उतरवलेल्या चोरीच्या लोखंडी सळ्या नंतर चढ्या भावाने अंबड-लिंकरोड वरील दुकानात विकला जातो. असे अवैध धंदे कोणाच्या आशीर्वादाने चालत असून उलट सुलट चर्चा आहे.