घरमहाराष्ट्रनाशिकशहरात अवैध पद्धतीने वृक्षांची कत्तल करण्याचा घाट

शहरात अवैध पद्धतीने वृक्षांची कत्तल करण्याचा घाट

Subscribe

वृक्षतोडप्रकरणी महापालिका आयुक्तांना नोटीस

महापालिकेने वृक्षतोडीसाठी हालचाली सुरु केली असून, न्यायालयाच्या जनहित याचिकेच्या आदेशाचा भंग करणारी ही मोहीम आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त कैलास जाधव आणि मुख्य वनसंरक्षक, नाशिक यांना याचिकाकर्ते ऋषिकेश नाझरे यांच्यातर्फे अ‍ॅड. तेजस दंडे यांनी सोमवारी (दि.१४) न्यायालयाचा अवमान झाल्याबाबत कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

शहरात अवैध पद्धतीने २९ वृक्षांची कत्तल करण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्याला विरोध करण्यासाठी हॅशटॅग चिपको, नाशिक ही चळवळ पुढे सरसावली आहे. वृक्ष प्राधिकरण समितीने सर्वोच्च व मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा अवमान न करता पालन करावे अन्यथा जिल्ह्यात सांकेतिक पद्धतीने आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. पर्यावरणप्रेमींनी जी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर ८ मे २०१५ रोजी महापालिकेने झालेल्या आदेशानुसार वृक्षतोडीला वृक्षतोडीसंदर्भात प्रक्रिया सुरु केली मनाई करण्यात आली होती. त्याबाबत तत्कालीन महापालिका आयुक्तांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो अयशस्वी ठरला होता. असे असताना आता तीच झाडे महापालिकेकडून पुन्हा तोडली जाणार आहेत. याप्रकरणी पर्यावरणप्रेमींनी आश्चर्य
व्यक्त केले आहे.

Rahul Deshpandeनाशिक महापालिका सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करीत आहे. जी झाडे आधी वाचवली, तीच झाडे पुन्हा तोडणे चुकीचे आहे. याप्रकरणी चिपको आंदोलन केले जात आहे. महापालिका प्रशासनाने झाडे तोडण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलन तीव्र केले जाईल.
– रोहन देशपांडे, नाशिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -