घरमहाराष्ट्रनाशिकइम्पॅक्ट : खासगी रुग्णवाहिकांना ‘सिव्हिल’कडून डिस्चार्ज

इम्पॅक्ट : खासगी रुग्णवाहिकांना ‘सिव्हिल’कडून डिस्चार्ज

Subscribe

जिल्हा शासकीय रुग्णालयातील गलथान कारभाराबाबत ‘आपलं महानगर’ने ‘खासगी रुग्णवाहिकांचे ‘सिव्हिल’मध्ये अतिक्रमण या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करताच खासगी रुग्णवाहिकांनी शवविच्छेदन आवारातील पार्किंगची जागा रिकामी केली.

जिल्हा शासकीय रुग्णालयातील गलथान कारभाराबाबत ‘आपलं महानगर’ने ‘खासगी रुग्णवाहिकांचे ‘सिव्हिल’मध्ये अतिक्रमण या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करताच खासगी रुग्णवाहिकांनी शवविच्छेदन आवारातील पार्किंगची जागा रिकामी केली. या ठिकाणी कोणाच्या आशीर्वादाने खासगी रूग्णवाहिका पार्किंग करतात, याबाबात आता रुग्णालयातील कर्मचार्‍यांमध्ये उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.

जिल्हा शासकीय रूग्णालयातील गलथान कारभार पुन्हा एकदा पुढे आला असून खासगी रुग्णवाहिकांनी सिव्हिलच्या जागेवर डल्ला मारल्याची धक्कादायक बाब ‘आपलं महानगर’च्या निदर्शनास आणली. जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या आवारात खासगी रग्णवाहिका रात्रीच्या वेळी पार्क केल्या जातात. शासकीय किंवा खासगी रुग्णवाहिका मध्यरात्री मृतदेह शवविच्छेदनासाठी घेऊन येतात. त्यावेळी त्या वाहनांना बेकायदा रग्णवाहिकांच्या पार्किंगमुळे अडथळे येतात. रुग्णवाहिकांना अडथळ्यांची शर्यत पार करून मार्ग काढावा लागतो. शासनाच्या रुग्णवाहिकांना मोठ्या मुश्किलीने पार्किंगसाठी जागा उपलब्ध होत असताना खासगी रुग्णवाहिका चालकांच्या दादागिरीने रुग्णांचीही परवड होत आहे. राज्य शासनाने १९ मार्च २००८ ला निर्णय घेतला आहे. या आदेशानुसार खासगी व्यक्ती, संस्था, राजकीय पक्ष, संघटना, सेवाभावी संस्था यांना मोकळ्या जागेचा वापर करता येणार नाही, असे निर्णयात म्हटले आहे. शासकीय रुग्णालयात खासगी संस्था, व्यक्तींनी व्यवसायासाठी जागा दिल्यास रुग्णालय परिसरात अस्वच्छता, गर्दी व त्यामुळे जंतुसंसर्ग यामुळे उपचार प्रक्रियेत अडथळे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे रुग्णांच्या आरोग्याच्यादृष्टीने व भविष्यात रुग्णालयाच्या विस्तारासाठी लागणारी मोकळ्या जागेची आवश्यकता याबाबींचा विचार करून शासनाने, असा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

 फक्त शासकीय वाहनांना परवानगी

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात फक्त शासकीय वाहनांना परवानगी आहे. खासगी रुग्णवाहिकांना पार्किंगसाठी परवानगी देण्यात आलेली नाही. गुजरात, मध्यप्रदेशसह इतर जिल्ह्यातील खासगी रुग्णवाहिकांचे चालक दिवसा किंवा रात्रभर प्रवास करतात. ते शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रूग्णालयात येतात. त्यांचा सहानुभूतीपुर्वक विचार करत शवविच्छेदन होईपर्यंत गाडी थांबवली. त्यानंतर खासगी रुग्णवाहिका चालक घेऊन जातात. – डॉ. निखिल सैंदाणे, जिल्हा अतिरिक्त शल्यचिकित्सक.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -