घरमहाराष्ट्रनाशिकभारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आदिवासींचे महत्वपूर्ण योगदान - मुख्यमंत्री शिंदे

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आदिवासींचे महत्वपूर्ण योगदान – मुख्यमंत्री शिंदे

Subscribe

आदिवासींनी संस्कृती जपण्यासोबतच जंगलामधील नैसर्गिक संपदेची जपणूक केली, तिचे संवर्धन केले.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) हे महाराष्ट्राच्या विविध भागात जाऊन तिथल्या विकास कामांचा आढावा घेत आहेत, विकासकामांचा शुभारंभ करत आहेत. अशातच मुख्यमंत्री नाशिकमध्ये आहेत. दरम्यान आज आदिवासी दिन आहे त्यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला आहे.

नाशिक (nashik) मधील जनतेशी संवाद साधत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. स्वातंत्र्य चळवळीत आदिवासी बांधवांचे अपूर्व योगदान आहे. भगवान बिरसा मुंडा यांनी जल, जंगल आणि जमीन या न्याय हक्कांसाठी ब्रिटिश राजवटीविरोधात एल्गार पुकारला. या महान क्रांतिकारकाची आज जयंती सुद्धा आहे. याच निमित्ताने मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधत संबोधित करत होते.

- Advertisement -

देशभरातील अनेक आदिवासी बांधवांनी देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील आदिवासी बांधवांचे हेच योगदान लक्षात घेऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी मागील वर्षांपासून आदिवासी गौरव महोत्सव साजरा करायला सुरुवात केली. आदिवासी बांधवांच्या शौर्य, धैर्य आणि त्यागाला नमन कारण्यासाठी हा महोत्सव अतिशय महत्वपूर्ण ठरेल असं मुख्यमंत्री शिंदे नाशिक मध्ये बोलताना म्हणाले.

याचसंदर्भांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले; आदिवासी गौरव महोत्सव (adivasi gaurav mahotsav) हा महोत्सव पुढील तीन दिवस असणार आहे. या तीन दिवसांमध्ये आदिवासी संस्कृतीचे वैभव अनुभवता येणार आहे. आदिवासींनी संस्कृती जपण्यासोबतच जंगलामधील नैसर्गिक संपदेची जपणूक केली, तिचे संवर्धन केले. असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

- Advertisement -

त्याच बरोबर भारताच्या सर्वोच्च स्थानी म्हणजेच राष्ट्रपती पदावर आदिवासी समाजाच्या द्रौपदी मुर्मू आहेत. मुर्मू यांना देशाच्या सर्वोच्च स्थानी विराजमान होण्याची संधी दिल्या बद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले. शिंदे – फडणवीस सरकार तुम्हाला नक्कीच न्याय देईल असे अश्वासन सुद्धा मुख्यमंत्री शिंदे यांनी आदिवासी बांधवांना दिले.


हे ही वाचा –  …म्हणून आपल्यावर प्रहार केला जातोय, जयंत पाटील यांचे भाजपावर शरसंधान

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -