घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रलाचखोर तलाठ्यास तुरुंगवास

लाचखोर तलाठ्यास तुरुंगवास

Subscribe

महसुली रेकॉर्डला नोंद करण्यासाठी तक्रारदाराकडून १३ हजार रुपयांची स्वीकारणार्‍या सिन्नर तालुक्यातील नायगाव येथील तलाठ्यास शुक्रवारी (दि.५) न्यायालयाने १० वर्षाची शिक्षा सुनावली. मनोज किसन नवाळे असे शिक्षा झालेल्या तलाठ्याचे नाव आहे.

तक्रारदाराच्या आई-वडिलांनी ब्राम्हणवाडे शिवारात १० गुंठे शेतजमीन खरेदी केली होती. महसुली रेकॉर्डला नोंद करण्यासाठी मनोज नवाळे यांनी तक्रारदाराकडे १३ हजार रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिककडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पथकाने शहानिशा करत १४ ऑगस्ट २०१३ रोजी सापळा रचत नवाळे यांना १० हजारांची लाच घेताना अटक केली. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. खटल्याचा निकाल शुक्रवारी (दि.५) अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. नायर यांनी दिला. न्यायालयाने त्यास १० वर्ष सक्तमजुरी व २० हजार रुपय दंड, दंड न भरल्यास सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली. खटल्याचे कामकाज सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता कडवे यांनी पाहिले.

Sushant Kirve
Sushant Kirvehttps://www.mymahanagar.com/author/ksushant/
गेल्या १२ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. क्राईम, आरोग्य, साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर लिखाण. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि जीवघेण्या अपघातांमध्ये घट होण्यासाठी सातत्याने लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -